नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मागासवर्गीय शेतकरयाचा शेतजमिनी महसुली कायदे धाब्यावर बसवून बळकावणारया सुझलान आणि 385पवन ऊर्जा टावर मालकांवर अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करावा व आदिवासी शेतकरयाचा शेतजमिनी वर अवैध रस्ते विजवाहक पोल टाकून अतिक्रमण काढून टाकण्यात यावे या मागणीसाठी आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आदिवासी मागासवर्गीय शेतकरी व विविध जनसघटना च्या वतीने तीव्र निषेधआंदोलन करण्यात आले. यावेळी पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय शेतकरी कामगार संघर्ष समिती चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरूण रामराजे भिला दौलत भील तानु भील बळीराम भील परबत पाडवी दामु भील संजय भील भिमराव सामुद्रे धनराज शिंदे यांसह शेकडो शेतकरी कामगार उपस्थित होते या आंदोलनाला भिल्लीसथान टाईगर (बी टी एस) चे अध्यक्ष राजकुमार वळवी देवीसिंग वळवी. बहुजन समाज पार्टी चे अध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे. जितेंद्र तायडे. बंजारा र्क्राती दलाचे प्रदेश अध्यक्ष श्रावण चव्हाण सी पी एम चे नेते कॉमरेड नथथु भाऊ साळवे रिपाई चे नानासाहेब ठाकरे रिपाई चे अपपा वाघ गौतम इदवे योगेश कुमार संजय पाटील इ पाठिंबा दिला. दरम्यान उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी सुझलान कंपनी चे सुनील जोशी सह वरिष्ठ व्यवस्थापक यांना न बोलवता आदिवासी विरोधी व कंपनी ला फायदा होईल अशी भूमिका घेतली त्याचा समितीने निषेध केला आहे
सुझलान या कार्पोरेट कंपनी ला जिल्हा प्रशासन चे अभय. अरूण रामराजे व शेतकरयाचा आरोप.
