नंदुरबार उपवनसंरक्षक अधिकारी (प्रादेशीक ) यांचे अंतर्गत नंदुरबार रोहायो वनविभागाच्या जंगलाच्या भांगडा नियत क्षेत्र कक्ष ३१ मध्ये वनविभागाच्या हद्दीत असलेल्या टेकडीचा लाखो ब्रास गौण खनीज झाडे व जैवविविधता नष्ट करुन ठेकेदाराने पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे शाखा अभीयंता वउप अभीयंता वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक यांच्या संगनमताने लाखो ब्रास गौण खनीज माती, मुरुम दगड रस्त्याच्या कामासाठी वापरल्या बद्दलतात्काळ विभागीय वनाधिकारी दक्षता यांच्या मार्फत चौकशी करुन ठेकेदारासह पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे शाखा अभीयंता व उप अभीयंता वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच ठेकेदाराचे पोकलैंड मशीन, डंपर, जे.सी.बी. सरकार जमा करुन वनविभागाच्या टेकडीचा लाखो ब्रास गौण खनीज झाडे व जैवविविधता नष्ट करुन गौणखनीज काढल्या बद्दल त्या झाडांची व गौणखनीजाचे मुल्यांकन करुन ठेकेदारास वरील अधिकाऱ्यांकडुन पाच पट रक्कम वसुल करुन शासनाच्या तिजोरीत जमा करावी तसेच. वनक्षेत्रपाल,वनपाल, वनरक्षक यांनी भांगडा नियत क्षेत्रात अतिक्रमण काढण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चकेले तर या भांगडा वन जमिनीवर झाडे न लावता चक्क रस्त्याच्या कडेला काटेरी झाडांमध्ये फेकुन दिलेले आहेत. तरी नर्सरीमध्ये रोपे तयार करण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च केले असता ही झाडे फेकणारे वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी व झाडे तयार करण्यासाठी झालेला खर्च हा त्यांचेकडुनवसुल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर व कृष्णा निकम यांनी मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवूर्ती धुळे व विभागीय वन अधिकारी दक्षता यांच्या कडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करुन मागणी केली आहे
*नंदुरबार उपवनसंरक्षक अधिकारी (प्रादेशीक ) यांचे अंतर्गत नंदुरबार रोहायो वनविभागाच्या जंगलाच्या भांगडा नियत क्षेत्र कक्ष ३१ मध्ये वनविभागाच्या हद्दीत असलेल्या टेकडीचा लाखो ब्रास गौण खनीज झाडे व जैवविविधता नष्ट करुन ठेकेदाराने पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे शाखा अभीयंता व उप अभीयंता वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक यांच्या संगनमताने लाखो ब्रास गौण खनीज माती, मुरुम दगड रस्त्याच्या कामासाठी वापरल्या बद्दल तात्काळ विभागीय वनाधिकारी दक्षता यांच्या मार्फत चौकशी करुन कार्यवाही ची मागणी केली आहे*
