चैताली भस्मे यांचा सिनिअर सिटिझन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट द्वारे सत्कार*

*चैताली भस्मे यांचा सिनिअर सिटिझन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट द्वारे सत्कार* सिनियर सिटिझन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट द्वारे जागतिक महिला दिन निमित्त नागपूर जिल्ह्यातील कर्तबगार महिलांचा सत्कार महारष्ट्र कामगार कल्याण भवन रघुजी नगर येथे संपन्न झाला.सर्पमित्र प्राणीमित्र वन्यजीव रक्षक तसेच मांगल्य फाऊंडेशन संस्थापिका चैताली भस्मे यांना ” कर्तबगार महिला पुरस्कार २०२४ ” ने सम्मानित करण्यात आले वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षापासून मनुष्य सेवा ,प्राणी सेवा तसेच गरजू जेष्ठ नागरिकांची सेवा,सापांना जीवनदान इत्यादी विविध समाज हितेशी कार्याची दखल घेऊन , सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन जेष्ठ नागरिकांनी सत्कार केला आणि चैताली च्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले . याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई मोटघरे ,विशेष पाहुणे सर्वश्री हुकुमचंद मिश्रीकोटकर,अध्यक्ष स्थानी मनोहरराव खर्चे, ऍड अविनाश तेलंग, कल्याण अधिकारी सचिन वंजारी ,मधुकरराव ढोके, उपाध्यक्ष डॉ.मनोहर तांदुळकर ,वसंतराव पाटील,आयोजक व सचिव सुरेश रेवतकर इत्यादी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!