*आरोग्य केंद्रात महिला नाही,पुरूष नाही,कोण सेवक उपचार करणार?**शहाणा आरोग्य केंद्रात रिक्त पदे तात्काळ भरा- बिरसा फायटर्सची मागणी*नंदूरबार:प्राथमिक आरोग्य केंद्र शहाणा ता.शहादा येथे anm/ mpw व इतर रिक्त पदे तात्काळ भरा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,करण सुळे,धनायुष भंडारी,पवन सुळे,रमेश पटले,रवींद्र नावडे,भावसार मोते, चिका भोसले, धना ठाकरे,रायमल पवार, करण पटले,भाईदास चव्हाण, मांगीलाल पावरा,शशिकांत पावरा,दिलवरसिंग पाडवी,हारसिंग भील, फेंदा वळवी,फुलसिंग वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र शहाणा येथील एकूण लोकसंख्या ३७७४३ आहे.आरोग्य केंद्रांतर्गत १ उपकेंद्र शहाणा २ वडगाव ३ दूधखेडा ४ चांदसैली तसेच एकूण गावे १३ व पाडे ४ जोडलेले आहेत. या केंद्रात एकही आरोग्य सेविका किंवा आरोग्य सेवक नाही व इतर पदेही रिक्तच आहेत. नियमित लसीकरण व रूग्णसेवा देतांना खूपच अडचणी येत आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.कर्मचारी पूर्ण वेळ सेवेत नसल्यामुळे रूग्णांना आरोग्य सेवा पूर्ण पणे मिळण्यास खूपच अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र शहाणा येथे anm/mpw व इतर रिक्त पदे तात्काळ भरावीत ,हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषद नंदूरबार समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा प्रशासनास देण्यात आला आहे.
Related Posts
कर्जोत ता. शहादा जि.प.शाळा : विद्यार्थ्यांनी घेतला आनंद मेळाव्याचा आनंद
कर्जोत ता. शहादा जि.प.शाळा : विद्यार्थ्यांनी घेतला आनंद मेळाव्याचा आनंदकर्जोत ता. शहादा–येथील जिल्हा परिषद शाळेत दि.१६ जानेवारी २०२४ रोजी बाल…
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे तर्फे कार्याध्यक्षपदी आबा पगारे यांची निवड:
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे तर्फे कार्याध्यक्षपदी आबा पगारे यांची निवड:नेर: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे…
समाजकार्य महाविद्यालय तळोद्यात स्वच्छता मोहीम संपन्न
*समाजकार्य महाविद्यालय तळोद्यात स्वच्छता मोहीम संपन्न* समाजकार्य महाविद्यालय तळोदा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे राष्ट्रीय सेवा…