*विक्रमी लॉटरी विक्रेत्यांचा* *उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते* *सत्कार* मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) महाराष्ट्र राज्याची वैभवशाली परंपरा असणाऱ्या गुढीपाडवाभव्यतम सोडत एक करोड रुपयांची असून सोबत लाखो रुपयांची बक्षिसे आहेत. यंदा या लॉटरीची पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक तिकीटांची विक्री करणाऱ्या राज्यातील. लॉटरी विक्रेत्यांचा जाहीर सत्कार हा उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.. ५५ वर्षाचा वारसा असणाऱ्या राज्य लॉटरीचे यंदाचे महत्त्वाचे पर्व असून त्यासाठी विक्रेते हे ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करीत आहेत राज्य लॉटरीमुळे शासकीय महसूलात वाढ होणार असून सोबतच बेरोजगारांना रोजगारही मिळणार आहे. वितरक आणि विक्रेत्यांनी या संदर्भात आवश्यक ते पुरावे हे जमा करावेत जेणे करून सत्कारमूर्ती विक्रेत्यांची निवड करणे सहज शक्य होईल. आकर्षक मानचिन्ह, शाल, श्रीफळ विजेत्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सातार्डेकर यांनी दिली. *विक्रेत्यांना आवाहन**पारदर्शक विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित असणार्या महाराष्ट्र राज्याच्या लॉटरीची विक्रमी विक्री करण्यासाठी विक्रेत्यांनी प्रयत्न करावेत त्यासाठी ग्राहकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. चला विक्रेत्यांनो गुढीपाडवा भव्यतम सोडतीच्या विक्रीसाठी आपण सारे प्रयत्न करुया असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे*
विक्रमी लॉटरी विक्रेत्यांचा* *उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते* *सत्कार*
