कोष्टी समाजाच्या अडचणी सोडवू- सुनेत्रा पवारांची ग्वाही…

*कोष्टी समाजाच्या अडचणी सोडवू- सुनेत्रा पवारांची ग्वाही…!* बारामती (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) कोष्टी समाजाच्या विविध अडचणी समजून घेत राज्य व केंद्र शासन व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली. येथील नटराज नाटय कला दालनात नुकताच कोष्टी समाजबांधवांचा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, कोष्टी समाजाचे विणकर क्षेत्रात मोठे काम आहे, देशाच्या विकासातही समाजबांधवांनी मोलाचे योगदान देऊ केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना सुरु करुन समाजबांधवांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान राज्याच्या विकासात अजित पवार यांचे काम सर्वांसमोर आहे, प्रत्येक बारामतीकर हा माझ्या कुटुंबातील एक घटक आहे या दृष्टीने दादा काम करत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी घेतलेली भूमिका बारामतीकर निश्चित समजून घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक कोष्टी व्हिजन ट्रस्टचे संस्थापक अँड. सचिन देवांग यांनी केले. या प्रसंगी कोष्टी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणराव वरोडे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती अँड. भास्करराव गुंडगे, इचलकरंजीचे उद्योगपती उत्तमराव म्हेत्रे, बारामती तालुका कोष्टी समाजाचे अध्यक्ष नितीन डोईफोडे, नटराजचे अध्यक्ष किरण गुजर, रमेश भंडारे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. सुवर्णा सरोदे यांनी सूत्रसंचालन केले. कोष्टी व्हिजन ट्रस्टचे उपाध्यक्ष नितीन दिवटे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते. स्वाती गुंडगे व अँड. सुषमा देवांग यांनी सुनेत्रा पवार यांचा सत्कार केला. कोष्टी व्हिजन ट्रस्ट बारामती शाखा पदाधिकारी व समाज बांधव यांचे वतीने स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यात जितेंद्र भुजबळ, सचिन भंडारे, विवेक पांडकर, अनिरुद्ध शिळवणे यांनी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!