प्रतिनिधि = नरेश शिंदे
दलित शेतकर्यांची वर्ग 2नवी शर्यत ची जमीन बेकायदेशीर पणे औद्योगिक कारणासाठी खरेदी करायची परंतु ती इतर कारणासाठी वापरायची म्हणुन फसवणूक केल्याचा नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात हे मोठे रकेट कार्यरत आहे. नंदुरबार तालुक्यातील ढढाणे वावद चौपाळे रजाळे बलवंड येथे अशा वर्ग 2 च्या शेकडो एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आली आहे व या प्रकरणातील मुख्य सुत्रधार सह तिघांवर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वी ही या तथाकथित भुमाफिया विरोधात मागे विविध दलित मागासवर्गीय संघटना यांनी पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन व पत्रकार परिषदेत या जमीन व्यवहार ची चौकशीची मागणी केली होती. तरी या भूमाफिया वर झालेल्या कार्यवाही मुळे एकच खळबळ उडाली आहे या गुन्हा चा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन साहेब व तालुका पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या माध्यमातून सुरू झाला आहे. आरोपींना त्वरित अटक करण्यात आली पाहिजे अशी मागणी होत आहे