ग्रामपंचायत मार्फत माहिती देण्यास टाळा टाळ,मोठा भ्रष्टाचार झाला असावा*

*ग्रामपंचायत मार्फत माहिती देण्यास टाळा टाळ,मोठा भ्रष्टाचार झाला असावा* मोहिदे त.श. येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार कायद्या अंतर्गत,श्री.कैलास गुलाब सोनवणे,रा. मोहिदे ता.श.यांनी सदरील माहिती मागितली,जसे अतिक्रमण धारकांच्या नोंद वही,गावठाण परिसरात ग्राम ं पंचायत कडून दिलेले जागेचे ठराव, अतिक्रमण धारकांची नावांची लिस्ट ,त्यांना ग्रामपंचायत कडून पाठवलेल्या नोटिसंची झेरॉक्स कॉपी व जागा कोणत्या कमा साठी दिलेले त्याचे नोंदी.हे सर्व माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागितली असता मोहिदा ग्रामपंचायत कार्यालयातून ग्राम सेवकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली, जसे की या प्रमाणे.. आम्ही ते रेकॉर्ड देवू शकत नाही.ते खूप किचकट काम आहे,व बरेच उत्तरे देवून माहिती नाकारून देण्याच्या अगदी मनापासून प्रयत्न ग्रामसेवकांनी केला.आणि बुद्धीपुरस्कर केंद्रीय कायदा २००५ , माहितीचा अधिकार कायद्याच्या अवमान व उल्लंघन ग्रामसेवकांनी के ले आहे.मोहिदे त.श.ग्रामपंचायत कार्यालयात विवीध विषयांवर माहिती मागितली जाते,परंतु काहींना काही बहाणे ,गाव गुंडांचे प्रेशर आणून ग्रामपंचायत प्रशासन माहिती देण्याचे टाळत असते.याचे कारण ग्राम पंचायत प्रशासन चा गैरव्यवहार समोर येवू नये,हा असावा . असे मला वाटते,मोहिदे त.श.ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी खूप मोठ्या प्रमाणावर हुकुमशाही चा वापर करून ,मनमानी पद्धतीने कारभार चालवला आहे.म्हणून कोणतीही माहिती मागितली तर ते टाळाटाळ करतात. पण मी गावातील नागरिक या नात्याने जरा ही खपवून घेणार नाही,याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल,मी .कैलास गुलाब सोनवणे,माहिती अधिकार कार्यकर्ता तथा पत्रकार या न्यूज चा माध्यमातून सांगू इच्छितो की ,मोहिदे त.श.ग्रामपंचायत प्रशासनाने केंद्रीय कायदा माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघन केल्याचा प्रकरणी पंचायत समितीच्या प्रारांगणात आमरण उपोषण करेन.व योग्य ती कार्यवाही ची मागणी वरिष्ठ कार्यालय करावी लागेल मोहिदा गावा तील गावठाण हद्दीतील सर्व जमिनीची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोहीम राबविण्यासाठी निवेदाद्वारे सांगण्यात येईल.याची मोहिदे,त.श.ग्रामपंचायत प्रशासनाने नोंद घ्यावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!