शहादा येथे संभाजी नगरातील बोधीवृक्ष परीसरात संविधान बचाव देश बचाव समिती व भारत जोडो अभियानाचे समन्वयाने सभा घेण्यात आली

शहादा येथे संभाजी नगरातील बोधीवृक्ष परीसरात संविधान बचाव देश बचाव समिती व भारत जोडो अभियानाचे समन्वयाने सभा घेण्यात आली….. सभेची सुरुवात “मै तुमको विश्वास दू,तुम मुझको विश्वास दो” या गिताने करण्यात आली सभेचे अध्यक्ष म्हणून श्रमिक मुक्ती दलाचे काॅ भारत पाटणकर हे उपस्थित होते. आज देशातल्या जनतेला भाजप हरले पाहिजे असे का वाटते?कारण…..हे सरकार भारत सरकार नसून एका फॅसिस्ट प्रवृत्तीच्या मोदींचं सरकार आहे असे सर्वसामान्य जनतेचे मत आहे…..तसेच ज्या पार्टीचे सरकार आहे ती पार्टी म्हणजे असंवैधानिक चारित्र्याची पार्टी आहे म्हणून अशी एकखांबी सरकार पुन्हा भारताच्या संसदेत आल्यास २०२४नंतर या देशात निवडणूकाच होणार नाहीत अशी परिस्थिती या देशात निर्माण होईल अशी भिती काॅ पाटणकर यांनी व्यक्त केली. भारतीय राज्यघटनेचे पालन करण्यासाठी मोदी सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, उलट प्रत्येक क्षेत्रात मोदी सरकार अपयशी ठरली आहे आणि खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. असेही ते म्हणाले. या सभेस महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते….. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी म्हणाले….. उमेदवार कोणीही असो आमचा पक्ष आघाडी धर्म पाळणार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणणारच ही शपथ आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे… असेही ते म्हणाले. यावेळी आदिवासी एकता परिषदेचे महामहीम व सुप्रसिद्ध साहित्यिक वहारु सोनवणे म्हणाले की,आदिवासींनी मतदान करतांना डोळ्यापुढे मणिपूरची घटना आणावी, मध्यप्रदेश मध्ये आदिवासींच्या तोंडावर मुतणाऱ्याचा चेहरा आणावा,हसदेव जंगलातून हाकलून लावलेल्या व आज हलाखीचे जीवन जगत असणाऱ्या गरीब आदिवासींचा चेहरा आणावा. आपण आपली स्वतःची ओळख शंभर रुपयांत मत विकणारे असे न करता , आदिवासी स्वाभिमानी आहे अशी ओळख निर्माण केली पाहिजे.धनदांडग्या लोकांचे हे सरकार पाडण्यासाठी सर्व आदिवासी संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे.असे मत त्यांनी व्यक्त केले….. वंचित बहुजन आघाडीचे गजेंद्र निकम व नाना कुवर यांनी या सभेस पाठिंबा देतांना म्हटले की लोकशाही आमचा प्राण आहे, जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत शान आहे….. म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची आमच्यावर मोठी जबाबदारी आहे.बिरसा फायटर्सचे सुशीलकुमार पावरा हे पण महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्यासाठी शर्यतीत आहेत त्यांना तिकीट मिळाल्यास सर्व संस्था संघटनां त्यांच्या बाजूने उभ्या राहतील मात्र तिकीट न मिळाल्यास ते ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार आहेत.या सभेत तळोदा तालुक्यातील काॅम्रेड जयसिंग माळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या सभेस काॅंग्रेसचे शहादा तालुका अध्यक्ष डॉ सुरेश नाईक, शिवसेनेच्या मालती वळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इंजिनिअर चंद्रकांत पाटील, सुप्रसिद्ध लेखक दिनानाथ मनोहर,जाती अंत संघर्ष समितीचे सुनील गायकवाड,तापी काठ संघर्ष समितीचे पितांबर बि-हाडे, अरुण जगदेव, पावरा समाज उन्नती मंडळाचे मोरे साहेब,डोंगऱ्या देव समिती साक्रीचे डोंगर बागुल, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विनायक साळवे, आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे भिमसिंग वळवी,महा.राज्य काॅंग्रेस आदिवासी सेलचे प्रदेश सचिव अशोक सोनवणे, नर्मदा बचाव आंदोलनाचे ओरसिंग गुरुजी, झुंजार क्रांती वृत्त समुहाचे कृष्णा कोळी,लोकशाही जागर समितीचे चंद्रसिंग बरडे,जिल्हा परिषद नंदुरबारचे उपाध्यक्ष सुहास नाईक….. सलोखा समितीच्या रंजना कान्हेरे, वनिता पटले,प्रशिक युवा मंडळाचे दिनेश बि-हाडे,राजा पाटोळे, राहुल पाटीदार,तसेच भारत जोडो अभियानाचे नंदुरबार तालुक्याचे को ऑर्डिनेटर निशा तांबे, पितांबर बि-हाडे अरुण जगदेव,धडगावचे शिवाजी घोडराज, रघुनाथ बळसाणे,शहाद्याचे गणेश वळवी, चुनिलाल ब्राम्हणे,दिलवर पाडवी . साक्रीचे को ऑर्डिनेटर अशोक सोनवणे व प्रेमचंद सोनवणे प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक दादाभाई पिंपळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!