उद्योग ऊर्जाद्वारे यशस्वी महिलांना “नारी ऊर्जा” पुरस्कार प्रदान…!

*उद्योग ऊर्जाद्वारे यशस्वी महिलांना “नारी ऊर्जा” पुरस्कार प्रदान…!* बदलापूर (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)विद्या ट्युटोरियल्स – बदलापूर आणि उद्योग ऊर्जा – बिझनेस नेटवर्किंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतंच ध्रुव अकॅडमी बदलापूर येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात बदलापुर- डोंबिवली परिसरातील विविध कार्यक्षेत्रामध्ये यशस्वीपणे कार्यरत असणाऱ्या महिलांना “नारी ऊर्जा ” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . सदर कार्यक्रमास, सन्माननीय डॉक्टर संगीता पांडे मॅडम -प्रिन्सिपल आदर्श कॉलेज , प्रभाताई शिर्के -माहेर वाशिन संस्था , बदलापूर, सौ रेणू तिवारी मॅडम -संस्थापक संचालिका आस्था क्लिनिक, पत्रकार श्रद्धा ठोंबरे- आपले बदलापूर चॅनल , उद्योग ऊर्जाच्या सल्लागार उल्का बागवे मॅडम या सन्माननीय महिला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. उद्योग ऊर्जा द्वारे या सर्व सन्माननीय महिलांचा त्यांच्या गौरवास्पद कौतुत्वाबद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाच्या निमित्ताने ध्रुव अकॅडमी मधील यूपीएससी एमपीएससी आणि बँकिंग क्षेत्रात अधिकारी बनण्यासाठी तयारी करणाऱ्या मुला मुलींच्या मातांचा सत्कार करण्यात आला. बिझनेस नेटवर्किंग क्लबच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिक प्रोत्साहन देणाऱ्या उद्योग ऊर्जाच्या एक्झिक्यूटिव्ह कमिटी मधील चित्रा राऊत मॅडम, विजय शीला तांबे मॅडम यांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर संगीता पांडे मॅडम यांनी उपस्थितांना संबोधित करताना गार्गी आणि मैत्रेयी यांच्याप्रमाणेच महान कार्य करण्याचा संदेश दिला . प्राचीन काळापासूनच महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर होत्या. आता पुन्हा एकदा महिलांना संधी मिळते आहे . त्यामुळे आपल्यातल्या गार्गी आणि मैत्रेयीला संधी द्या आणि संघटित होऊन एकमेकांच्या सहकार्याने जास्तीत जास्त यशस्वी होण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले . उद्योग ऊर्जाच्या सल्लागार उल्का बागवे मॅडम यांनी उद्योग ऊर्जाच्या माध्यमातून स्त्रियांनी संघटित होऊन व्यावसायिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करावी यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. महिलांनी व्यावसायिक दृष्ट्या स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायला हवे आणि त्यासाठी संघटितपणे कार्य करायला हवे असे प्रतिपादन त्यांनी केले . दिव्यांग मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या सन्माननीय रंजू त्रिपाठी (आस्था क्लिनिक) यांनी महिलांनी आपला सेल्फ रिस्पेक्ट आणि इगो यातील फरक ओळखावा त्यातून प्रगती साधता येते असे सांगितले . तसेच डिव्होर्स सारख्या वेगाने वाढणाऱ्या समस्याची गंभीरता समजावून सांगितली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ,शेकडो स्त्रियांना माहेरपणीचा आनंद देणाऱ्या माहेर मशीन संस्थेच्या संचालिका प्रभाताई शीर्के म्हणजे आधुनिक मताच . अगदी पदर खोचून न दमता न थकता अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक महिलेचे माहेर पण त्या कशा प्रकारे करतात आणि त्यातून त्यांना किती निरपेक्ष आनंद मिळतो हे सांगत होत्या. अनेक समस्यांमधून मार्ग काढून गाठीशी पैसा नसताना इतर महिलांना माहेर पण देण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रपंच म्हणजे खरंच सर्व महिलांसाठी खूप मोठा आदर्श आहे. आपले बदलापूर चॅनेलच्या बदलापूरच्या लाडकी पत्रकार. श्रद्धा ठोंबरे या कार्यक्रमास उपस्थित होत्या . वयाच्या 19 व्या वर्षापासून पत्रकारितेचे काम व्रतस्थपणे करणारी, निर्भीडपणे लोकांच्या समस्या मीडियाद्वारे मांडताना तिला होणारे अनेक त्रास, धमक्यांचे फोन, चुकीचे आरोप यांच्यावर विजय मिळवून कशाप्रकारे ध्येयावर टिकून आहेत आणि त्यांचे हे देशसेवेचे समाजसेवेचे व्रत त्यांचे किती आनंद देते हे त्यांनी उपस्थित महिलांना सांगितले . याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक विद्या ट्युटोरिअल्सच्या संचालक ,संस्थापक विद्या सावंत मॅडम यांनी बाईपण कसे भारी असते… म्हणजेच एकीकडे हे बाई पण खूप सुंदर तर असतेच पण तितकेच आव्हानांनी भरलेले देखील असते हे सांगताना आज प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःसाठी सुद्धा जगले पाहिजे, स्वतः मधली ऊर्जा ओळखली पाहिजे आणि एकमेकींच्या साथीने स्वतःची ही प्रगती केली पाहिजे असा मोलाचा सल्ला उपस्थित सर्व महिलांना दिला. उद्योग ऊर्जाच्या सल्लागार पूजा इंदुलकर मॅडम यांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले मान्यवर महिलांचे आभार मानले . सत्कार स्वीकारणाऱ्या या सर्व महनीय व्यक्ती यांच्यात आपण स्वतःला पाहायला हवे , त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी आणि महिलांनी स्वतःच्या उत्कर्षासाठी एकमेकांना सहाय्य करायला हवे असे आवाहन केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योग ऊर्जाच्या व्यावसायिक सदस्या सौ संपदा कानडे यांनी केले . सदर कार्यक्रमास आसावरी नगरदेवळेकर , शमिका मुनगेकर , धनश्री राऊत ,विद्या नलावडे , जागृती मुंशी , विजयशीला सावंत तांबे , चित्रा राऊत हेमलता करमरकर इत्यादी उद्योग ऊर्जाचे व्यावसायिक सदस्य उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!