एस बी आय आरसेटी नंदुरबार येथे डिजिटल /आधुनिक प्रशिक्षण साहित्याचे उद्घाटन

एस बी आय आरसेटी नंदुरबार येथे डिजिटल /आधुनिक प्रशिक्षण साहित्याचे उद्घाटन भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे डिजिटल /आधुनिक प्रशिक्षण साहित्याचे उद्घाटन श्री. अविनाश तिवारी उप महा व्यवस्थापक , नाबार्ड यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला श्री. अभिजीत रांजनकर जिल्हा विकास अधिकारी , नंदुरबार शे. सचिन गांगुर्डे व्यवस्थापक , जिल्हा अग्रणी बँक , नंदुरबार श्री. गणेश पठारे संचालक , स्टेट बँक आरसेटी, नंदुरबार उपस्थित होते. भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतींना स्वयं रोजगाराचे मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाते. सद्या आरसेटीत महिलांसाठी भरतकाम व शिवणकाम याचे 30 दिवसीय निवासी प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षण संस्थेत नाबार्डच्या वित्तीय समावेशन अंतर्गत इंटरएक्तिव पॅनल , प्रोजेक्टर , स्क्रीन , साऊंड सिस्टिम आणि बेंचेस इ. डिजिटल /आधुनिक प्रशिक्षण साहित्य प्रदान करण्यात आले. याप्रसंगी श्री. अविनाश तिवारी यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करतांना आपला व आपल्या परिवाराचे जीवनमान उंचावण्यासाठी आयुष्यात कुठले तरी एक कौशल्य आपण आत्मसात केले पाहिजे आणि त्या कौशल्याबाबत आपण नेहमी अद्ययावत असले पाहिजे , ते अद्यावत राहण्यासाठी या डिजिटल /आधुनिक प्रशिक्षण साहित्याचा वापर करावा असे आवाहन केले. श्री. सचिन गांगुर्डे यांनी आरसेटीत दिली जाणारी प्रशिक्षणे ही उच्चकोटीचे असतात आणि इथून प्रशिक्षित झालेला युवक किंवा युवती घरी गेल्यावर आपला व्यवसाय सुरू करतातच म्हणून आपणही घरी गेल्यावर आपला व्यवसाय सुरू करावा असे संगितले . श्री. गणेश पठारे यांनी प्रस्ताविकेत नाबार्डने उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल /आधुनिक प्रशिक्षण साहित्याचा वापर करून आरसेटी महाराष्ट्रात नाही तर देशात अव्वल स्थानी पोहोचविणारच असा संकल्पच आम्ही केला आहे असे आश्वासित केले व नाबार्डचे आभार देखील मानले व येणार्याी काळात देखील नाबार्ड असे सहकार्य करेल अशी अपेक्षाही व्यक्त केली. सूत्रसंचालन श्री. गिरधर बैसाणे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी पाटील , श्रीमती तृप्ती पतंगे पूर्वीशा बागूल , जयश्री आगळे , राजेंद्र पवार , देवा वळवी , यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!