दोंडाईचेत गेल्या काही दिवसांपासून मोबाईल हिसकावून घेण्याच्या घटनेत वाढ दोंडाईचा पोलिसांचे दुर्लक्ष

*दोंडाईचेत गेल्या काही दिवसांपासून मोबाईल हिसकावून घेण्याच्या घटनेत वाढ दोंडाईचा पोलिसांचे दुर्लक्ष* दोंडाईचा शहरात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. रस्त्याने पायी मोबाईलवर बोलत जाणाऱ्यांचा हातातून दुचाकीवर येऊन मोबाईल हिसकावून घेणे , दोंडाईचा रेल्वे स्थानकावरून ते दोंडाईचा अमरधाम या मार्गावर रेल्वे कमी वेगाने असते याच्याच फायदा घेऊन चोरटे खिडकीवर बसलेले प्रवासी यांच्या हातातून किंवा दांडुक्याचा साहाय्याने मोबाईल हिसकावून घेतात याकडे दोंडाईचा पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मोबाईल चोरटे व चोरीच्या मोबाईल विकत घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी दोंडाईचेतील सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. धावपळीच्या युगात मोबाईल प्रत्येकाची जीवनावश्यक वस्तू बनून गेली आहे. रस्त्याने पायी मोबाईलवर बोलत असणाऱ्या नागरिकांचे पाठीमागून दुचाकीवरून येणारे चोरटे मोबाईल हिसकावून घेऊन जात आहेत. काही क्षणात हजारों रूपयांचा मोबाईल गमवल्यानंतर बरेचसे नागरिक प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन तक्रार दाखल करत नाही कारण त्यांना चांगल्याप्रकारे ज्ञात आहे इथे लाखों रूपयांचा मोटरसायकली चोरीला जातात त्यांचा थांगपत्ता लागत नाही तिथे आपला पंधरा वीस हजारांच्या मोबाईल साठी पोलीसांना कुठे वेळ असेल म्हणजे एकप्रकारे पोलीसांवर विश्वासच राहिला नाही. ‘ कानून के हाथ लंबे होते है ‘ ही म्हण प्रसिद्ध असून तिचा प्रत्ययदेखील अनेक वेळा आला आहे परंतु एक , दोन वर्षापासून दोंडाईचा पोलिस प्रशासनाचे हात हे फक्त खिशात आहे असेच दिसून येत आहे. चोरीला गेलेल्या मोबाईलवरून कुठे फोन करून काही उलटे पालटे बोलल्यास किंवा एखाद्या अन्य गुन्ह्यांसाठी वापरल्यास उपद्व्याप वाढेल म्हणून संबंधित इसम पोलिस ठाण्यात औपचारिकता म्हणून मोबाईल गहाळ झाल्याचे पत्र देतो. त्यावर पोलीसांनी नोंद करून सही शिक्का दिल्यानंतर संबंधित इसम ज्या कंपनीचे सीमकार्ड आहे त्यांच्या कार्यालयात जाऊन आपला मोबाईल क्रमांक बंद करतो प्रत्येकाला पोलिस लागलीच मोबाईल चोरी झाल्याचा दाखला लगेच देतात असे होत नसल्याने संबंधितांची चांगलीच घालमेल सुरू होते म्हणून बरेचसे इसम साधी तक्रारही करत नाही मात्र मोबाईल चोरीला गेल्याने त्यामधील कॉन्टॅक्ट नंबर , फोटो व्हिडिओ आदी खाजगी महत्वाची माहिती काही क्षणात गमावतो पोलीसांनी मोबाईल चोरीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सीसीटीव्ही कॅमेरे , खबरे यांच्यामार्फत मोबाईल चोरट्यांचा व चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे अल्पवयीन चोरटे निघाल्यास *खाकी* ची ताकद दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे. *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!