सावखेडा नजीक भीषण अपघात, दोन दुचाकी स्वार गंभीर जखमी.

सावखेडा नजीक भीषण अपघात, दोन दुचाकी स्वार गंभीर जखमी.

शहादा तालुक्यातील सावखेडा गावाजवडीळ वळण रस्त्या जवळ जात शाळकरी मुलं जात असताना सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान शहाद्याकडून येणारा आयशर ट्रक भरधाव वेगाने जात असताना वळण रस्त्यावरून वडगाव येथील दोन दुचाकी स्वार यांना जोरदार धडक देत आयसार वाहन फरार झाले.

संजय मोहिते शहादा

सविस्तर वृत्त असे की दुचाकी क्रमांक MP -46-MD-3954 हिच्यावर परीक्षा देण्यासाठी वडगाव येथील पंकज जितेंद्र पावरा वय 22 जीवन जितेंद्र पावरा वय 19 दोघेही वडगाव येथील राहणारे आहेत. दोघे शाळकरी विद्यार्थी असून शहादा येथे परीक्षा देण्यासाठी जात होते. त्यांना शहादा कडून येणाऱ्या आयशर ट्रक ने सावखेडा गावा जवळील वळण रस्त्यावर जोरदार धडक दिल्याने दोन्ही विद्यार्थी जबर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9 ते 9:30 वाजेच्या सुमारास घडली. मात्र आयशर ट्रक चालक तेथून पसार झाला असून जखमींना सावखेडा गावाचे वरिष्ठ नागरिक आणि युवक व येणाऱ्या जाणाऱ्या पिंपरडे दूधखेडा असलोद येथील नागरिकांनी जखमींना तात्काळ खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय शहादा येथे दाखल केले असता तेथून त्यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलवण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या वळण रस्त्यावर नेहमीच अपघात होऊन शेकडो व्यक्ती मरण पावले असून त्याअनुषंगाने सावखेडा येथील नागरिकांनमार्फत गतिरोधक बसविण्यासाठी वारंवार संबंधित विभागाला निवेदन देऊन मागणी केली असता तरी सुद्धा गतिरोधक बसविले जात नाही, अजून किती बळी जाणार तेव्हा संबंधित अधिकारी दखल घेतील असा रोष नागरिकांन मार्फत केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!