*एका लाच प्रकरणात नवापूर तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार यांना अटक;लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कामगिरी**विविध कलमानुसार गुन्हा दाखल* सद्या लाचेची प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यातच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे हनु रामा वळवी याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती अशी कि, वळवी यानी ते स्वतः तहसिल कार्यालय येथे फौजदारी लिपर्णांक असल्याचे भासवून तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर १२ जण अशा १३ लोकांविरुद्ध दाखल गुन्हयातील प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण बंद करून देण्यासाठी प्रत्येकी १,००० रू. प्रमाणे १३ लोकांचे एकुण १३ हजार रूपयांची लाचेची मागणी करून, तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडुन १० हजार घेण्याचे मान्य करून लाचेची मागणी केली. यापैकी ७ हजार रूपये आरोपी याने अगोदरच तक्रारदार यांच्याकडुन घेतले असल्याने उर्वरीत ३ हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते. तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम ३ हजार रूपये आरोपी याने तहसिल कार्यालय नवापुर येथील महसुल शाखेत पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर आरोपीस लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्याच्याविरिध नवापुर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ (अ) सह भा.दं. वि. कलम १७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी लाचेची मागणी करणे व प्रोचाहन देण्याकामी आरोपी नामे महेश पवार व जितेंद्र पाडवी यांना देखील अटक करण्यात आलीय. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. माधव रेड्डी, नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पथकाने केलीय.*
एका लाच प्रकरणात नवापूर तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार यांना अटक;लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कामगिरी**विविध कलमानुसार गुन्हा दाखल*
