पाडव्याच्या मुहूर्तावर पाण्यासाठी चिमठाणे येथील गावकऱ्यांनी नांगरली नदी …..
प्रवीण भोई
चिमठाणे गावं म्हटले म्हणजे..आपल्याला आठवन होते. ती बुराई नदीत पिकणाऱ्या डांगर , टरबुजांच्या गोडव्याची या मुळे बुराई नदीची ख्याती मुंबई ,पुणे दूरपर्यंत पसरली होती त्या वेळेस बुराई नदी बारमाही पाण्याचा स्रोत उपलब्ध होता ..कालांतराने मात्र त्याचं बुराई नदीची सद्याची परिस्थिती काय आहे.. सद्या बुराई नदीला वाळवंटाचे स्वरूप आले आहे…कारण बुराई पात्रात होणारा कमी होणारा पाण्याचा साठा ..कोणाला न जुमानता चालणारा रात्रंदिवस वाळूचा उपसा….त्या मुळे नदीचे रूपांतर वाळवंटात झाले आहे..मात्र नदी नांगरून जलस्थर वाढवता येतो..असा प्रयोग प्रकाशा जवळ गोमाई नदीवर करण्यात आला होता…त्या मुळे परिसरातील बोर,विहीर नदी,तलाव यांचा पाण्याचा स्थर वाढतो…असा प्रयोग गोमाई नदी वर यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे…. यावर्षी दुष्काळाचे सावट असल्याने आतापासून पाण्याच्या नियोजनाची वेळ आली आहे.नदी हा पाण्याचा सर्व्यात मोठा स्रोत मानला जातो.नदीचाच स्रोत अटला तर पाण्यासाठी वन वन भटकावे लागेल.म्हणूनच नदी नांगरून पाण्याच्या स्रोत वाढवता येईल या अनुषंगाने चिमठाणे, दलवाडे, पिंप्री,येथील गावकऱ्यांनी मिळून लोकसहभागातून नदी नांगरण्याचे काम हाती घेतले आहे त्यात उद्योजक, संदीप पाटील तसेच अनिल पाटील,यांनी जेसीबी उपलब्ध करून दिले तर नरेंद्र पाटील यांनी 20 लिटर डिझेल उपलब्ध करून दिले बाळा मराठे याने 5 लिटर डिझेल तर कोणी कोणी ट्रॅक्टर दिले तर कोणी डिझेल अशा प्रकारे लोकसहभागातून नदी नांगरण्याला सुरुवात केली तसेच जेवढी मदत होईल तेवढी मदत गावकऱ्यांनी करावी असे आव्हान करण्यात आले आहे… गोमाई नदीच्या प्रयोगाच्या आधारावर चिमठाणे बुराई नदी पात्रात नदी नांगरण्याचां यशस्वी प्रयोग लोकसहभागातून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला व त्याला सुरुवात करण्यात आली आहे पिलखेडा आश्रमाचे प.पू योगी दत्त नाथ महाराज यांच्या हस्ते नारळ फोडून बुराई नदी नांगरणीला सुरुवात करण्यात आली …त्या ठिकाणी -माजी सरपंच खंडू वंजी भिल, नरेंद्र पाटील, अनिल पाटील, दत्तू पाटील, योगेंद्रसिंग गिरासे , कल्याण पाटील, गिरधर पाटील, बाळा मराठे,प्रविण शिंपी, भरत गिरासे, आप्पा पाटील, सुनील गा गरे,सुभाष भिल, भटू पाटील,नानाभाऊ भिल,हिरालाल भिल,एकनाथ भिल, प्रकाश भिल, छोटू भगत,चेतन पाटील,सुभाष सोनार, भगवान सिंग गिरासे, रणसिंग भिल, राजभाऊ माळी, बापू भील, दलपत सिंग गिरासे,संदीप भील,महेंद्र भील आदी उपस्थित होते….