दोंडाईचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दगडफेक 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक मा. धिवरे साहेबांनी तात्काळ दखल घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला

दोंडाईचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दगडफेक 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल ✍️✍️✍️✍️ धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक मा. धिवरे साहेबांनी तात्काळ दखल घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला

प्रतिनिधि = आण्णा कोळी

पुर्ण महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतांना दोंडाईचेत काही धर्मांध व्यक्तींनकडून दगडफेक करण्यात आली व त्यामुळे परिसरात व दोंडाईचा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वेळीचं लक्ष घालून धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक मा.धिवरे साहेब स्वतः घटनास्थळी भेट देऊन स्थिती नियंत्रणात आणली धर्मस्वातंत्र्याचा हक्क सर्व भारतीयांना घटनेने अनुच्छेद 25 ते 28 अंतर्गत स्पष्टपणे सामाविष्ट होते की प्रत्येक भारतीय नागरिकाला त्यांच्या धर्माचे शांततेने पालन करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटना केवळ व्यक्तींनाच नाही तर भारतातील धार्मिक गटांनाही धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकाराची हमी देते . दोंडाईचा येथील मिरवणूक शांततेत ठरवलेल्या मार्गाने जात असतांना शहरातील जामा मस्जिद समोरील रस्त्याने पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा दिशेने प्रवेशद्वाराजवळ रात्री 11 च्या सुमारास मुस्लिम वस्तीतुन दगड , विटांचा मारा करण्यात आला. मिरवणुकीत दगडफेक ची बातमी कानी पडताच दोंडाईचा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे साहेबांनी तात्काळ हेडक्वार्टरला कळवले वेळ न गमावता धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक मा. धिवरे साहेबांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली व परिस्थिती नियंत्रणात आणली वेळीचं लक्ष दिल्याने मोठा अनर्थ टळला याबाबत दोंडाईचेतील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. मग प्रश्न येतो की दोंडाईचा पोलिस प्रशासन धार्मिक उत्सवाला अतिरिक्त पोलिस बळ का मागवत नाही दोंडाईचेतील लोकसंख्या हि 2011 च्या जनगणनेनुसार 46,000 होती ती आता 80 ते 90 हजार च्या घरात आहे व दोंडाईचा पोलिस प्रशासनाचा स्टाफ केवळ 30 ते 35 चा मागील सहा महिन्यांपासून दोंडाईचा पोलिसांना घरफोड्या करणारी टोळी सापडतं नाही , मोबाईल चोर सापडत नाही, मोटरसायकल चोर सापडत नाही…मागे एक उल्लेखनीय कामगिरी केली दोंडाईचा पोलिसांनी ती म्हणजे टिल्या सापडला प्रत्येक वृत्तपत्रात ही बातमी छापून आली टिल्या सापडला.. टिल्या सापडला.. टिल्या सापडला अरे पण त्या शर्मा रिकेरींग वाल्याची चोरीचे काय झाले याची दखल मात्र कोणी घेत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट अवस्था आहे दोंडाईचेची आणि याला लोकप्रतिनिधी पण तेवढाच जबाबदार आहे आपल्याला ज्या मतदारसंघात जनतेने निवडून दिले आहे म्हणजे त्यांची सुरक्षा व आरोग्य याचीही कधीतरी दखल घ्यायायला हवी नुसती चौकात पुतळे उभे करून आणि आपल्या मर्जीतील अधिकारी आणुन चालत नाही. तरी मा. धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे साहेबांनी तात्काळ दखल घेऊन जी परिस्थिती नियंत्रणात आणली त्याच्यासाठी दोंडाईचेतील नागरिक आपले नेहमी ऋणी राहतील 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!