*अनधिकृत बांधलेल्या लॉन्स वर पालिकेचा हातोडा*.
प्रतिनिधि= राजू मंसुरी
सविस्तर वृत्त असे की:- शहादा नगर परिषद हद्दीतील मलोणी शिवारातील सर्वे नं 66/1,2,3 पैकी जागेवर ( playground Town hall ) आणि (civic centre) आरक्षित असून सदर आरक्षित जागेवर व तेथील सर्वे मधील खुल्या जागेवर अनेक वर्षापासून अनधिकृत लॉन्स चालत होते,सदर आरक्षित जागा रहिवासी यांच्या उपयोगात ना येता एका धनाढ्याने माय पावर मध्ये तेथे अवैधरीत्या लोखंडी पत्राचे शेड व पक्के बांधकाम करून लॉन्स बांधले व अनेक वर्षापासून भाडे तक्त्यावर देउन लाखो रुपये कमावले परंतु जागरूक नागरिक मोहम्मद इमामउद्दीन लोहार,यानी केलेल्या तक्रारीवरून नगरपालिका,मुख्याधिकारी,दिनेश सिनारे, यांनी सदर लॉन्स अनधिकृत असल्याचा निदर्शनात आले असता लॉन्स मालकाला नोटीसद्वारे आठ दिवसाच्या आत आपण केलेले अनधिकृत वापर व बांधकाम काढून टाकावे अन्यथा नगरपालिका कायदेशीर कारवाई करेल व फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येईल अशी नोटीस वाजवण्यात आले असून आघाप दोन आठवडळे उलटून सुध्दा सदर जागा खाली न झाल्याने मोहम्मद लोहार यांनी पालिकाकडे दाद मागितली आहे