नवापूर : नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना 50 हजारांची लाच स्वीकारताना नाशिक एसीबीच्या पथकाने अटक केल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.नाशिकच्या पथकाने केला सापळा यशस्वी एका गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी व प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी अडीच लाखांची लाच पोलीस निरीक्षक वारे यांनी मागितली होती मात्र 50 हजार रुपयांमध्ये तडजोड झाल्यानंतर तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली. नाशिक एसीबीने नवापूरात बुधवारी सायंकाळी अत्यंत काळजीपूर्वक सापळा रचला व लाच स्वीकारताच वारे यांना अटक करण्यात आली. नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे व सहकाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला.
तहसीलदार पाठोपाठ एक बडा अधिकारी एसीबी चा जाळ्यात
