शहादा पोलिसांची दबंग कामगिरी, जिवंत काडतूस सह दोघांना अटक

शहादा गावातील दराफाटा कडुन लोणखेडा मार्गे दोन इसम हे एका विना नंबरच्या काळया रंगाच्या पल्सर मोटर सायकलवर त्यांचे कब्जात विनापरवाना/अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगून शहादा कडे येत असल्याची गोपनीय माहिती शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांना मिळाल्याने श्री. बुधवंत यांचे सुचनांनुसार शहादा पोलीस ठाण्यातील पोउपनि-प्रविण कोळी व स्टाफ अशांनी बातमीची सत्यता पडताळण्यासाठी लोणखेडा ता. शहादा येथे गेले. त्याठिकाणी लोणखेडा गावात चाररस्ता परिसरात शहादा पोलीस स्टाफ दबा धरुन बसले असतांना मिळालेल्या बातमी प्रमाणे दराफाटा कडून दोन इसम हे एका काळया रंगाच्या पल्सर मोटार सायकलने येऊन लोणखेडा चाररस्ता चौफुलीवर 15.50 वाजेचे सुमारास थांबले असता सदर ठिकाणी शहादा पोलीसांनी त्यांना थांबवून विचारपूस करता वाहन चालविणा-या इसमाने त्याचे नाव 1) राहूल ऊर्फ रणजित राजेश पथरोड, वय-30 वर्षे, रा.निवाली रोड, सरकारी दवाखान्याजवळ, सेंधवा, जि.बडवाणी, राज्य मध्यप्रदेश व मागे बसलेल्या इसमाने त्याचे नाव 2) पवन बन्सीलाल पाटील, वय-35, वर्षे, रा.निंबार्क कॉलनी, गल्ली नं.-2, सेंधवा, जि.बडवाणी, राज्य मध्यप्रदेश असे सांगितले. सदर व्यक्तीची अंगझडती घेता त्याचे जवळ एक गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन (जिवंत काडतूस) राऊंड विनापरवाना स्वतःचे कव्जात बाळगत असल्याचे मिळून आले. त्यानुसार सदर दोनही इसमांना ताब्यात घेण्यात येऊन शहादा पोलीस ठाणे येथे गुरनं. 319/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 सह महा. पोलीस कायदा कलम 37 (1) (3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा श्री. सदाशिव वाघमारे (अति. कार्यभार शहादा) यांचेउपनिरीक्षक मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रविण कोळी, असई/प्रदीपसिंग राजपूत, पोलीस नाईक घनश्याम सुर्यवंशी, योगेश थोरात, पोलीस शिपाई मुकेश राठोड, दिनकर चव्हाण, भरत उगले, योगेश माळी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!