सर्पमित्र , प्राणिमित्र ,वन्यजीव रक्षक आणि मांगल्य फाउंडेशन च्या अध्यक्षा चैताली भस्मे यांनी रस्यावरिल मुक्या बेवारस पशुंसठी नागपुर शहरातील विविध भागात लावले पाण्याचे जलकुंड

सर्पमित्र , प्राणिमित्र ,वन्यजीव रक्षक आणि मांगल्य फाउंडेशन च्या अध्यक्षा चैताली भस्मे यांनी रस्यावरिल मुक्या बेवारस पशुंसठी नागपुर शहरातील विविध भागात लावले पाण्याचे जलकुंडप्रतिनिधी,,= नरेश शिंदे . उन्हाळ्या च्या तप्त उन्हात दर वर्षी पाण्याअभावी रस्त्यावरील अनेक मुके जनावर, पशू, पक्षी यांचा जीव जातो. रस्त्यावरील मुक्या जनावरांची तहान भागविण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मांगल्य फाऊंडेशनच्या वतीने नाग सापपुर मध्ये विविध ठिकाणी पाण्याचे जलकुंड लावण्यात आले आहे तसेच तेथील स्थानिक प्राणीमित्र आणि जागरूक नागरिकांना जलकुंडांमध्ये दररोज पाणी भरण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे आणि त्यांनी ही जबाबदारी अतिशय चोख पार पाडली आहे . सर्पमित्र, प्राणीमित्र, वन्यजीव रक्षक आणि मांगल्य बहुउद्देशिय संस्थेच्या संचालिका व अध्यक्षा चैताली भस्मे यांच्या नेतृत्वात जयदुर्गा लेआऊट, उमंग सोसायटी, नंदनवन, चिटणीस नगर, धाडीवाल लेआऊट, नंदनवन, मौसम कॉलनी, नवनाथ सोसायटी, जयदूर्गा नगर, जुना सुभेदार लेआऊट, मनीष नगर, नरेंद्र नगर, आठरस्ता चौक, हसणबाग, भांडेवाडी,. अश्या प्रकारे नागपुरातील विविध ठिकाणी जलकुंड लावण्यात आले. संस्थेचे सदस्य आकाश गंधारे, नितीन गंधारे, सचिन भस्मे, निखिल गायकवाड, मिलिंद राऊत, किशोर साळवी, प्रदीप केचे, अक्षया पाटील, मर्सी अब्राहम, देवयानी पाटील, विजू डोंगरे, छाया साखरकर, वि. सं. बांबोडे,. इत्यादींनी सहकार्य केले.तसेच दररोज सकाळ संध्याकाळ जलकुंडांमध्ये पाणी भरण्याची जबाबदारी मंदिरा चौधरी, रुची पांडे, संगीता दळवी, प्रीती कांबळे, मंदा मंडुलवार, सुनीता शेंद्रे, श्रद्धा चौबे, श्रीकांत चौबे, शुभांगी महाजन, ललिता मेश्राम, कस्तुरी दुपलिवार, प्रीती धर्माधिकारी, कविता रेवतकर यांनी पार पाडली.मांगल्य बहुउद्देशिय संस्था ही सण 2005 पासून संपूर्ण महाराष्ट्रा राज्यात कार्यरत असून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रांत कार्य करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!