*नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न..!* कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)५ जून २०२४ जागतिक पर्यावरण दिवस.या दिवसाच्या निमित्ताने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था महाराष्ट्र ठाणे जिल्हा उपाध्यक्षा अनिता प्रविण कळसकर यांनी वृक्षारोपण आणि वृक्षवाटप कार्यक्रम चे आयोजन केले होते .कल्याण सार्वजनिक वाचनालय आणि शशांक बालविहार पुर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा कल्याण पश्चिम येथे वृक्षारोपण आणि वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पार पडला. सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस मा.भिकू बारस्कर यांना मधुमालती चे झाड याप्रसंगी भेट म्हणून देण्यात आले.तसेच वाचनालयातील ग्रंथपाल आणि संपूर्ण वाचनालयातील महिला कर्मचारी यांना तुळशीचे रोपं आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच शशांक बालविहार पुर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत कडूलिंब,बदाम, जांभूळ, तुती अशी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडे लावण्यात आली.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली शिंदे मॅडम यांनी सहकार्य केले.नेफडो या संस्थेला झाडे लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.याप्रसंगी नेफडोचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.कदम सर तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा अस्मिता सावंत , राष्ट्रीय महिला सचिव आसिया मॅडम यांनी उपस्थिती दाखवली.तसेच या नगरसेविका डोईफोडे याप्रसंगी उपस्थित राहिल्या.या सर्वाचे तुळशीचे रोप ,शाल गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.छोट्याश्या अल्पोपहारानंतर देऊन कार्यक्रम ची सांगता झाली.कार्यक्रम आनंदाच्या आणि उत्साही वातावरणात पार पडला.
Related Posts
लाखापूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
लाखापूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी….. तळोदा तालुक्यातील लाखापुर (फॉ.) येथील माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक…
नंदुरबार जिल्ह्यात मनसेच्या वतीने एक सही संतापाची
नंदुरबार जिल्ह्यात मनसेच्या वतीने एक सही संतापाची राज्यातल्या राजकारणात सातत्यानं सुरु असलेल्या घडामोडींबद्दलचा रोष व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं…
मराठी साहित्य संस्कृती कला विकास अंतर्गत प्रकाशित गावाकडची माती माती मधली नाती या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी माझी स्वरचित रचना
मराठी साहित्य संस्कृती कला विकास अंतर्गत प्रकाशित गावाकडची माती माती मधली नाती या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी माझी स्वरचित रचना -शीर्षक –…