म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंट ही संस्था सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वांगसुंदर कलाविष्कार व एक कुटुंब ———————————————————–डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-म्युझिक मंत्रा च्या ऑर्गनाझर शर्मिला केसरकर यांचा सुरेल आवाज,गाण्याची आवड,उत्तम सादरीकरण,सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची जिद्द अशा या कुटुंब प्रमुख आहेत.ऑर्केस्ट्रा सादर करण म्हणजे तारेवरची कसरतच,पण शर्मिला केसरकर या लिलया ही कीमया पार पाडतात.म्युझिक मंत्रा इंटरटेनमेंट म्हणजे सर्व स्री-पुरुष सिंगर,म्युझिशीयन,रेकाॅर्डीस,तंत्रज्ञ व इतर सर्व सहका-यांना मायेच्या आपुलकीने बरोबर घेऊन जाणारी सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वांगसुंदर कलाविष्कार व एक कुटुंब आहेत.म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंट सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहे.म्युझिक मंत्राने मुंबई,नवी मुंबई,ठाणे,मुलुंड,बोरीवली,डोंबिवली अशा विविध शहरांमध्ये आपला ऑर्केस्ट्रा सादर करुन रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.म्युझिक मंत्राच्या ऑर्गनाझर शर्मिला केसरकर या भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या डोंबिवली शहर अध्यक्षा आहेत.तसेच त्या वैश्य वाणी समाजातही कार्यरत आहेत.म्युझिक मंत्राने राजहंस फाऊंडेशन,प्रारंभ प्रतिष्ठान ठाणे,प्रेरणा फाऊंडेशन बदलापूर,सहवास आश्रम जळगाव,शहापुर येथील आदिवासी शाळा,ग्लोबल मालवणी अशा अनेक सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी शो केलेले आहेत.म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंट ही संस्था गेली९वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे.म्युझिक मंत्राने सावन को आने दो,ये शाम मस्तानी,शान से,महाराष्ट्राची स्वरगाथा,दिल से दिल मिल गये,हमे राही प्यार के,मिले सुर मेरा तुम्हारा,असे विविध नामांकीत शो सादर केले आहेत.म्युझिक मंत्रा या एंटरटेनमेंट शो मध्ये रितेश बोवलेकर,सुनिल गावकर,गणेश मांजरेकर,सचिन खापरे,मोनी विकी या आणि अनेक म्युझिक अरेंजरच्या सहभागाने ऑर्केस्ट्रा सदाबहार होत असतो.तसेच सामाजिक कार्यकर्ते अरविंद सुर्वे यांचेही सहकार्य मिळत असते.तसेच सिंगर अतुल खरे,धनजंय बरगडे,राजेंद्र काळे,अजय ठाकुर,संजय पटवर्धन,प्रज्ञा तांबे,नितीन ठक्कर,मनी जोस,सोनाली वाळवे,नरेश,सोनाली गोस्वामी,इंद्रनिल कोंडु व इतर मान्यवर गायकांच्या कंठस्वरातुन सुमधूर गीतांची उधळण होत असते.जुन्या-नव्या गाण्यांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध होत असतात.म्युझिक मंत्रा प्रस्तुत ऑर्केस्ट्रा सादरीकरणात स्टेज व्यवस्था,म्युझिक एरेंजर,लाईटमन,साऊंड एरेंजर,म्युझिशीयन,बॅक स्टेज कलाकार,ऑर्गनाझर,सिंगर यांचा महत्वाचा सहभाग असतो.म्हणूनच म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंट ही संस्था सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वांगसुंदर कलाविष्कार व एक कुटुंब आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही,त्यांच्या पुढील सांस्कृतिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
Related Posts
धुळे जिल्ह्यातील दोन शिक्षकांची दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी निवड:
*नेर:* *धुळे जिल्ह्यातील दोन शिक्षकांची दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी निवड:* *नेर:* धुळे जिल्ह्यातील दोन शिक्षकांची भारत सरकारच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या…
मालपुर येथे शहीद जवान निलेश महाजन यांच्या स्मरनार्थ गावात रँली काढण्यांत आली
मालपुर येथे शहीद जवान निलेश महाजन यांच्या स्मरनार्थ गावात रँली काढण्यांत आलीमालपुर प्रतिनिधी गोपाल कोळीमालपुर गावातील तमाम नागरिकांना व तरुण…
कंडक्टर तीन दिवसापासून बेपत्ता पण आढळला मृतदेह…एकच खळबळ
शहादा येथील सदाशिव नगरात राहणारे राजेंद्र उत्तमराव मराठे (वय ५३) हे राज्यपरिवहन महामंडळाच्या शहादा आगारात एसटी बसचे वाहक आहेत. दि.१३…