बदलापुरात रंगली बिजनेस कॉर्पोरेट मीटिंग..!*

*बदलापुरात रंगली बिजनेस कॉर्पोरेट मीटिंग..!* (बदलापूर प्रतिनिधी -गुरुनाथ तिरपणकर)”चला भेटूया परस्परांना ऊर्जा देऊया ” या बोधवाक्याला अनुसरून व्यावसायिक मूल्य रुजवणे व वाढवणे, आणि एकमेकांच्या मदतीने व्यवसाय वृद्धी करणे या जिद्दीने कार्यरत असणाऱ्या आणि महाराष्ट्रातील 5000 ऊन जास्त उद्योजकांना एकत्र जोडून ठेवणाऱ्या उद्योग ऊर्जा या व्यावसायिक मंचाची 111 वी बिजनेस कॉर्पोरेट मीटिंग शनिवार दिनांक एक जून रोजी बदलापूर येथे संपन्न झाली. सदर कार्यक्रमास बदलापूर शहर व आसपासच्या परिसरातून 32 यशस्वी व्यावसायिक उपस्थित होते. बदलापूर सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात अनेक प्रकारचे नवनवीन व्यवसाय सुरू होत आहेत. अशा नव्या जुन्या व्यावसायिकांना व्यावसायिक मार्गदर्शन करणे, व्यावसायिक शिस्त व व्यावसायिक तत्वे आत्मसात करून व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना मदत करणे या उद्देशाने उद्योग ऊर्जा हा व्यावसायिक मंच कार्यरत आहे.बदलत्या व्यावसायिक वातावरणात, आणि सध्याच्या स्पर्धात्मक युगात व्यावसायिकाने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे, सोशल मीडियाचा वापर हुशारीने केल्यास आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे आहे, पण त्यासाठी आपले उत्पादने किंवा आपल्या सेवा हे उत्तम दर्जाच्या ठेवायला हव्यात. तसेच व्यावसायिकांनी एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांच्या मदतीने व्यावसाय केल्यास मोठे लक्ष सहज साध्य करता येते, असे प्रतिपादन उद्योग ऊर्जाचे संस्थापक श्री. निलेश बागवे यांनी केले. मागच्या पाच वर्षात फक्त एकमेकांच्या रेफरन्सेसच्या माध्यमातून आठ कोटीहून अधिक जास्त व्यावसायिक उलाढाल झाल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून या प्रसंगी उपस्थित असलेले ध्रुव अकॅडमीचे संस्थापक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री महेश सावंत यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. पावर ऑफ नेटवर्किंग या विषयावर बोलताना त्यांनी प्रत्येक व्यावसायिकाचा जनसंपर्क दांडगा असला पाहिजे असे आग्रही मत मांडले. व्यवसाय उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर आर्थिक गुंतवणुकीपेक्षा आपले नेटवर्किंग खूप चांगले असायला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक व्यावसायिकाने नेटवर्किंग कसे वाढवावे हे तंत्र शिकून घ्यायलाच हवे असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री मकरंद पाटील – गुड नेचर (लाकडी घाण्याचे तेल) आणि सौ.मालिनी शहा – डिस्ट्रीब्यूटर हेल्थ केअर प्रॉडक्ट यांनी आपल्या व्यवसायाचे सुंदर प्रेझेंटेशन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विद्या सावंत यांनी केले. उद्योग ऊर्जा हा मंच व्यावसायिक मदतीसोबतच एकमेकांना आवश्यक असलेला मानसिक आधारही देते अशी माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सौ.पूजा इंदूलकर यांनी केले. उद्योग ऊर्जा या व्यावसायिक मंचाच्या माध्यमातून हजारो व्यावसायिक एकमेकांशी जोडले गेले व एकमेका करू सहाय्य या उक्तीप्रमाणे कोट्यावधींचा व्यवसाय साध्य झाला. नवीन व्यावसायिकांसाठी अशा व्यावसायिक कट्ट्यांची खूपच आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. व्यावसायिकांना उपयुक्त ठरणाऱ्या अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उपस्थित व्यावसायिकांनी आयोजकांना धन्यवाद दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!