विजेचा धक्का लागून बैलजोडीसह चंद्रकांत माळी युवा शेतकऱ्याचा मृत्यू धुळे तालुक्यातील कापडणे शिवारातील घटना
कापडणे प्रतिनिधी – कापडणे व परिसरात दिनांक सात व नऊ जून च्या रात्री विजांच्या कडकडात वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली यामुळे खरीप हंगाम घेण्यासाठी शेतकऱ्यांची शेतात शेती मशागतीच्या कामांची लगबग सुरू झाली परंतु एन पेरणीच्या तोंडावर बैल जोडी सह कापडणे येथील चंद्रकांत मिठाराम माळी उर्फ लालू वय 40 वर्ष यांना शेतात शेती मशागतीची कामे वखरणी करत असताना विजेच्या खांबालगत औत सुरू असताना विजेच्या जोरदार धक्का लागल्याने दोन बैलांसह मयत युवा शेतकरी चंद्रकांत मिठाराम माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रकांत उर्फ लालू अतिशय कष्टाळू व प्रामाणिक होता नुकत्याच तीन ते चार महिन्यापूर्वी त्याचा विवाह सोहळा पार पडला होता सायंकाळी नित्यनियमाने लालू कापडणे गावासह परिसरातील भाजीपाला मोटार वाहनाने एकत्र करून शहादा मार्केटला विक्री करण्यासाठी दररोज सायंकाळी जात होता व दुसऱ्या दिवशी सकाळी शहादा मार्केटला भाजीपाला मालाची विक्री करून सकाळी दहा वाजेपर्यंत कापडणे येथील घर गाठत होता दररोज सकाळी दहा वाजा दरम्यान अंघोळ स्नान करून लालू परत पुन्हा नित्यनियमाने दररोज आपल्या शेतात आई-वडिलांना शेतात शेती काम करण्यासाठी मदत करण्यासाठी जात होता नितीन माने दिनांक 10 जून रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता कापडणे येथील राहत्या घरी स्नान झाल्यावर लालू हा आपल्या घरासमोरील महादेव वाडीतल्या महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या पिंडावर पाणी टाकण्यासाठी गेला तेथे मंदिरात दर्शन घेतले व लगेच मोटार सायकलने कापडणे दमाने रोडालगत असलेल्या आपल्या शेतात आई-वडिलांना मशागतीच्या कामासाठी मदत करण्यासाठी गेला असता यावेळी शेतात वडील मिठाराम सुका माळी हे शेती मशागत करण्यासाठी बैल जोडी सह वखरणीचे काम करत होते परंतु मुलगा लालू माळी याने वडिलांकडून दुपारी औत वखरणी करण्यासाठी घेतले असता थोड्याच वेळात दुपारी बारा वाजे दरम्यान दोन बैलांसह मयत चंद्रकांत मिठाराम माळी उर्फ लालू यांना विजेचा धक्का लागल्याने जागीच कोसळले पावसाळ्याला सुरुवात झाल्याने शेती मशागतीच्या कामाने जोर धरला असून सर्वत्र शेतकरी शेतात काम करत असताना सदर घटना ही परिसरांच्या शेतकऱ्यांच्या लागलीस लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी मोटार सायकलवर लालूला बसवून मुख्य रोडापर्यंत आणले येथून वाहनाद्वारे जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले असता येथील डॉक्टरांनी तपासणी करून लालू माळी ला मयत घोषित केले शव विच्छेदन केल्यावर मृतदेह सायंकाळी उशिरा नातेवाईकांकडे सोपवला लालू माळी ची अंत्ययात्रा कापडणे येथील राहत्या घरून सोमवारी सायंकाळी रात्री उशिरा अंत्ययात्रा निघाली होती लालू माळी च्या आकस्मात मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे युवा शेतकऱ्याचा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने शेतकरी कुटुंबावर मोठा आघात कोसळला कुटुंबातील सदस्यासह गावातील महिला व आभार वृद्धांनी दुःखाचा हंबरडा फोडला मयत लालू माळी च्या पश्चात पत्नी आई-वडील भाऊ वहिनी असा परिवार आहे.मयत युवा शेतकरी लालू माळी यांना वीज महावितरण कंपनीकडून व शासनाकडून कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी कुटुंबासह गावातून मागणी होत आहे