शहादा येथील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलात नवीन शैक्षणिक वर्ष २०२४ च्या पहिल्या दिवशी सकाळी साडेसात वाजता संस्थेचे सचिवप्रा.संजय जाधव व वर्षा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
वसंतराव नाईक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभ साठी मुख्य प्रवेशदरातील फलक रंगविण्यात आलेले होते.प्रवेशद्वाराला आंब्याच्या झाडांच्या पानांचे तोरण बांधून रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या.मुख्याध्यापक महेंद्र मोरे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांचे व पालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.नंतर विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपप्राचार्य जे.बी.पवार उपमुख्याध्यापक जे.एम.पाटील पर्यवेक्षक अनिल खेडकर पर्यवेक्षक ए.ए.खान उपस्थित होते.
संकुलातीलच शारदा कन्या माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींचे व पालकांचे नवीन शैक्षणिक वर्षात पहिल्याच दिवशी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.विद्यार्थिनी शैक्षणिक साहित्य व पुस्तके वाटप केली.दहावीतील गुणवंत विद्यार्थिनींचे कौतुक करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका एस.झेड.सैय्यद प्रशिक्षक शिक्षिका उपस्थित होते.