*डॉ पंजाबराव देशमुख यांच्या125 व्या जयंती निमित्त “कृषि संजीवनी पंधरवडा” चे आयोजन*

महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे मार्फतडॉ पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कृषी विभागाच्या वतीने डॉ पंजाबराव देशमुख कृषि संजिवनी पंधरवडा चे आयोजन केले असून मौजे कलमाडी ता शहादा येथे बीज प्रक्रिया जनजागृती दिन साजरा करण्यात आला असुन प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी श्री तानाजी खर्डे यांनी बिज प्रक्रिया मुळे होणारे फायदे, पिकांच्या उत्पादनात होणारी वाढ, कीड व रोगांचे नियंत्रण, बिज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी, प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया, त्यानंतर रासायनिक औषधांची प्रक्रिया, व शेवटी जिवाणू खतांची बिज प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी तसेच एकदल व द्विदल पिकांसाठी कोणते जिवाणू संवर्धक खत वापरावे या बाबत सविस्तर मार्गदर्शन केलेश्री सुरेश बागुल मंडळ कृषि अधिकारी यांनी कृषि संजिवनी पंधरवडा च्या नियोजन बाबत माहिती दिली,कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल वरील योजनांबाबत माहिती दिली, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना बाबत माहिती दिलीश्री अशोक अहिरे कृषि पर्यवेक्षक यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने बाबत माहिती दिली व शेतकरी बांधवांनी आधार संलग्न बँक खाते करणे, आधार इ के वाय करून घेणे बाबत आवाहन केले श्रीमती प्रज्ञा बिरारे कृषि सहायक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले व बीजप्रक्रिया प्रात्याक्षिक करून दाखवण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!