मूरजी पटेल व मनीष नायर या दोन भावी आमदारांच्या उपस्थितीत के. ईश्वर फाउंडेशन अंतर्गत न्यूरोथेरपी प्रशिक्षण व आरोग्य केंद्राची स्थापना.

*मूरजी पटेल व मनीष नायर या दोन भावी आमदारांच्या उपस्थितीत के. ईश्वर फाउंडेशन अंतर्गत न्यूरोथेरपी प्रशिक्षण व आरोग्य केंद्राची स्थापना.**मुंबई दि (प्रतिनिधी) के. ईश्वर फाउंडेशन (एनजीओ) अंतर्गत आशा आरोग्य केंद्राची स्थापना केली असून नुरोथेरपी, आयुर्वेद, निसर्गोपचार, होमिओपॅथी आणि मॉडर्न मेडीसिन द्वारे अत्यल्प दरात उपचार तसेच निदान करण्यात येणार आहे. सदर आरोग्य केंद्राचे उदघाटन शिवसेना शिंदे गटाचे भावी आमदार मनिष नायर यांच्या हस्ते भाजपा नेते मुरजी पटेल यांच्या उपस्थितीत झाले*के. ईश्वर फाउंडेशन च्या सर्वे-सर्वा श्रीमती एम. राणीताई वाघमारे यांच्या नेतृत्वात संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून सर्वतोपरी जनकल्याणासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत.साईधाम गौतम नगर येथे महापालिकेच्या निधीतून के. ईश्वर फाउंडेशन चे मार्गदर्शक विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी पाठपुरावा करून जनतेचे आरोग्य राखले जावे यासाठी परिसरातील मोकळ्या जागेत व्यायाम करण्याचे उपकरणे जोडली आहेत.या शिवाय “आशा आरोग्य केंद्र” उभारून अत्यल्प दरात रुग्णाची सेवा केली जाणार असून रिपब्लीकन पँथर नेते दिवंगत ईश्वर कांबळे साहेबांचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. सदरील केंद्रात आठवड्यातून ३ दिवस स्त्री रोग तज्ञ, 3 दिवस नेत्र तज्ञ, 2 दिवस ईएनटी, आणि लकवा, हाडाचे व नस दबली असलेल्या आजाराचे अतिशय कमी खर्चात चष्मा व रोगाचे निदान केले जाईल.आरोग्य केंद्र प्रमुख व फाउंडेशन चे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र कुमार यांनी आपल्या अनुभवातून हजारो रुग्णांना न्युरोथेरपी च्या माध्यमांतून बरे केले आहे. एनजीओ च्या माध्यमांतून वर्सोवा, अंधेरी, कांदिवली, मड व मालाड येथे न्युरोथेरपी केंद्र मागील ७/८ वर्षापासून चालू आहेत.न्युरोथेरपी ही आरोग्यदायक कला नवतरून व तरुणींनी शिकून आपल्या देशात चाललेली हाडे व नसांची दुःखी कमी करून स्वत:चं बेरोजगारपन कमी करून स्वावलंबी व निरोगी भारत बनविण्याच्या आमच्या धेयात सामील होवून फ्रांच्यायशी किंवा प्रशिक्षण घेवून सहभागी होवू शकता असा आशावाद जितेंद्र कुमार यांनी व्यक्त केला.के. ईश्वर फाउंडेशन च्या माध्यमातून जनहितार्थ बरेच उपक्रम राबवले जाणार असून राज्यभर फ्रांच्यायशी देवून अल्पदरात फ्रांच्यायशी घेण्यासाठी संस्थेच्या प्रतिनिधीशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने बॉबी जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!