बंजारा समाज हा अजूनही मागासलेला असून समाजातील मुख्य प्रवाहात येणाऱ्या लोकांनी सामान्य व गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहिले पाहिजे. = हिम्मत राठोड
नवीन उद्दिष्ट व नवीन संकल्पनांचा स्वीकार करून बंजारा समाजाला पुढे नेण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व कर्मचारी अधिकारी मिळून काम करू अशी इच्छा अखिल भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था नाशिक विभागीय अध्यक्ष हिम्मत राठोड यांनी व्यक्त केली . नंदुरबार येथील दंडपाणेश्वर मंदिरात रविवारी भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था यांच्या वतीने जिल्हास्तरीय सभा घेण्यात आले . भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था नाशिक विभागीय अध्यक्ष हिम्मत राठोड यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. याप्रसंगी बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था नंदुरबार जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली. सर्वानुमते आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त दिनेश बाबूलाल राठोड यांची जिल्हाध्यक्षपदी तर सचिवपदी प्रा. डॉ. अशोक राठोड , सहसचिव म्हणून हरिश्चंद्र करणसिंग खसावद तर उपाध्यक्षपदी जितेंद्र परशुराम चव्हाण , प्रल्हाद राठोड यांची म्हणून निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी प्रमोद मोहन जाधव,प्रसिद्धी प्रमुख महेंद्र धर्मा चव्हाण यांच्यासह जिल्हा कार्यकारणी सदस्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.यावेळे विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले समाजातील एकोपा, सामांजस्यपणा, विद्यार्थी शैक्षणिक विकास, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांची जयंती उत्सव साजरे करणे अशा अनेक विषयांची चर्चा करण्यात आली. सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था नूतन जिल्हा कार्यकारणी निवड सोबतच समाजाला पुढे नेण्यासाठी कर्मचारी म्हणून सर्वतोपरी समाजप्रथम या बोध वाक्याने जयघोष करण्यात आला. “””संघटनेला आज पावतो मिळालेल्या यशाला अजून पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचवण्याचे काम करू व यासाठी मला सर्व समाजातील ज्येष्ठांचे आशीर्वाद सहकार्य मिळेल या किंचित मात्र शंका नाही””” अशी भावना नूतन जिल्हाध्यक्ष दिनेश राठोड यांनी व्यक्त केली. विभागीय अध्यक्ष हिम्मत राठोड यांनी नूतन जिल्हा कार्यकारिणीतील सदस्यांचे निवडी बद्दल स्वागत व सत्कार केला. “””नवीन उद्दिष्ट व नवीन संकल्पनांचा स्वीकार करून समाजाला पुढे नेण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व मिळून काम करू””” अशी इच्छा हिम्मत राठोड यांनी व्यक्त केली. सदर नूतन जिल्हा कार्यकारणी सर्व सदस्यांचे धुळे सातपुडा विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संजय जाधव व विस्तार अधिकारी छोटू दलपत राठोड यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. बंजारा समाजातील विविध घटकांकडून नवीन कार्यकारणी निवडीबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.