दराणे रोहाणे गावात अतिवृष्टीमुळे गावात पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तू सह पशुधनाचे लाखोंचे

दराणे रोहाणे गावात अतिवृष्टीमुळे गावात पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तू सह पशुधनाचे लाखोंचे नुकसान…..प्रतिनिधी |प्रविण भोई-चिमठाणे परिसर… दिनांक 24-06-24 शिंदखेडा तालुक्यातील दराने रोहाणे गावात काल रात्री पावसाला सुरुवात झाली.वाजवी पेक्षा जास्त पाणी पडल्याने त्याचे अतिवृष्टीत रूपांतर झाले .आणि पाण्याचा प्रवाह जास्त झाल्याने . गावालगत असलेल्या नाल्याला मोठा पूर आला पण नाल्यात देखील पाणी मावत नसल्याने ते पाणी नाल्यालगत असलेल्या घरात शिरले.नाल्यापासून 4ते 5 फूट इतके उंच पाण्याचा प्रवाह होता .त्या मुळे ते पाणी थेट आजूबाजूच्या घरात शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले .आणि त्या लगत बांधलेले पशुधन ,बैल गाडी,पाण्याचे टँकर, मोटारसायकल,पत्रे,चारा,शेतीसाठी लागणारे खत,शेतीपूरक अवजारे,घरांचे नुकसान,किराणा माल,मंडप,पाण्याची मोटार,इत्यादी प्रत्यक्ष दर्शी नुकसान झाल्याचे दिसते..आणि पाण्याच्या प्रवाहात गाय,शेळ्या, बैल ,वासरू,असे पशुधन पाण्यात वाहून गेल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे,पशुधनाची जीवित हानि देखील झाली.बैल, गाय,वासरू,मृत्यू मुखी पडले आहेत.शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.विहिरी देखील बुजल्या गेल्या आहेत,जनावरांच्या चाऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे,तलाठीकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे..तहसीलदार यांनी देखील पाहणी केली.तसेच राजकीय पदाधिकारी यांनी देखील पाहणी केली,त्या ठिकाणी भा.ज.पा चे जिल्हा परिषद सदस्य -,भूपेंद्रसिंग गिरासे , माजी जिल्हा परिषद सदस्य -,विरेंद्रसिंग गिरासे, राजेंद्र देसले,तसेच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर,नरेंद्र पाटील आदींनी पाहणी केली.पंचनामा करून लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गावकरी करत आहेत…. शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार , दुष्काळ निधीचे पैसे मिळत नसल्याने दराने रोहाणे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. केवायसी करून 1महिना लोटला गेला तरी शेतकऱ्यांना दुष्काळ निधीचा लाभ मिळत नसल्याने,माजी सरपंच विश्वास आत्माराम पवार वउपसरपंचपसरपंच यांनी तहसीलदार यांना धारेवर धरले….व तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!