चौगाव जि.प.शाळेत शैक्षणीक साहीत्य वाटपसंदिप भाऊ कोळी व सुकलाल भाऊ सोनार यांचा अभिनव उपक्रम

*चौगाव जि.प.शाळेत शैक्षणीक साहीत्य वाटप**संदिप भाऊ कोळी व सुकलाल भाऊ सोनार यांचा अभिनव उपक्रम* चौगाव ता.चोपडा जि.प. शाळेतील गरीब,आदिवासी व गरजू विद्यार्थी वैशाली नंदलाल भिल, प्रविण गुलाब बारेला,कुलदिप वसंत कोळी,वेदिका राजेंद्र पाटिल,अनिता सखाराम बारेला,प्रणय योगेश कोळी,गोपाल संतोष भिल,स्वाती राजेंद्र कोळी,भावना शिवा चारण व आरोही रावसाहेब कोळी यांना चौगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षण व्यवस्थापण समितीचे मा.सदस्य संदिप भाऊ कोळी व सुकलाल भाऊ सोनार यांच्या माध्यमातून नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चौगाव येथील पो.पा.गोरख हरचंद पाटील होते.तर कार्यक्रमाला संदिप कोळी, विश्राम तेले,भरत देवरे,एकनाथ कोळी,मुख्याध्यापक संतोष सोनवणे,उपशिक्षक विलास पाटिल,विद्यानंद साठे,श्रीमती कपिला पाटिल,राजश्री बाविस्कर,प्रिती भावसार,प्रितम सोनवणे आदी उपस्थीत होते. यावेळी विश्राम तेले यांनी मुलांना वृक्षसंवर्धन व वृक्षलागवड विषयी मार्गदर्शन केले.पो.पा.गोरख पाटिल व संदिप कोळी तसेच शिक्षक विलास पाटिल यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व पटवून देत वृक्षलागवडीसाठी बीज संकलन व सीड बाँल बनवण्याबाबत मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन विलास पाटिल यांनी केले.तर, उपस्थीत मान्यवरांचे आभार शिक्षिका सौ.राजश्री बाविस्कर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!