प्रतिनिधी _प्रविण भोई..
चिमठाणे येथील बसस्थानकाची पावसाच्या पाण्यामुळे झालेली दुर्दशेला जबाबदार कोण?
चिमठाणे येथील बस स्थानक धुळे जिल्ह्यात नामांकित बसस्थानकांपैकी एक आहे. या बस स्थानकामधून दिवसभरातून शेकडो बस गाड्यांच्या फेऱ्या होतात.धुळे,नंदुरबार, शहादा, पुणे,नाशिक मुंबई,शिरपूर,साक्री मालेगाव, संभाजीनगर, जळगाव, अशा लांब पल्ल्याच्या बस गाड्यांच्या फेऱ्या होत असतात .सध्या मात्र वर्तमान स्थितीत त्या बस स्थानकाची दुर्दशा झालेली पहावयास मिळत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आजूबाजूला देखील काटेरी झाडे झुडपे वाढलेली आहेत बसस्थानकात लोकांना वेळ बघण्यासाठी घड्याळाची देखील सोय केलेली नाही ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे , बस स्थानकात अलाउन्सिंगची सोय नाही .अश्या विविध समस्यांनी चिमठाणे बस स्थानक घेरलेले आहे . पावसाच्या पाण्यामुळे बस स्थानकात मोठा जलसाठा तयार झाला आहे पावसाचे पाणी निघण्यासाठी बस स्थानका च्या आवारात कुठलीच सोय केलेली नाही दिसत नाही. त्या साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एकीकडे स्वच्छ सुंदर बस स्थानक या अभियानांअतर्गत चोपडा बस स्थानकाला 50 लाखाचे बक्षीस मिळाले आहे.बसस्थानकांना 50 50 लाखांचे बक्षीस मिळत असताना दुसरीकडे चिमठाणे बस स्थानक पाण्या च्या डपक्यांनी भरून सजलेले आहे.प्रवाशांना बसमध्ये चढउतर करताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे मात्र एसटी महामंडळाचे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. धुळे आगार प्रमुखांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.