*महिला समाज रामनगर नागपूर तर्फे सर्पमित्र प्राणीमित्र वन्यजीव रक्षक चैताली भस्मे यांचा सत्कार* वटपौर्णिमे निमित्त महिला समाज रामनगर तर्फे गेल्या पाचवर्षांपासून ” आम्ही ही सावित्री ” हा विशेष कार्यक्रम आयोजित केल्या जातो या कार्यक्रमात आधुनिक सावित्रिंची थेट भेट त्याचा सत्कार व मुलाखत घेतली जाते यावर्षी ” आम्हीही सावित्री ” या कार्यक्रमात नागपूर शहरातील दोन महिलांची निवड करण्यात आली त्यामधे समाजिक कार्यकर्त्या ऍड स्मिता सिंगलकर आणि सर्पमित्र ,प्राणीमित्र वन्यजीव रक्षक ,तसेच मांगल्य बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका ,सामाजिक कार्यकर्त्या चैताली भस्मे यांची निवड करण्यात आली महिला सर्पमित्र अशी ओळख असून फक्त सापांचे च नाही तर शेकडो पशू पक्षी, बेवारस जनावरांचे जीव चैताली यांनी वाचविले आहे संस्थेच्या माध्यमातून निराधार ज्येष्ठ नागरिकांची मदत, निराधार महिला , घरापासून भटकलेले वृध्द,गरजू लोक गरजू विद्यार्थी यांची पण मदत केलेली आहे त्यांचे केलेले कार्य महिला सक्षमीकरणासाठी खरोखरच प्रेरणा दायक आहेअश्या या आधुनिक सावित्रिंचा सत्कार करून त्यांना सन्मानित केल्या गेले कार्यक्रमाची सुरुवात ही पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केल्या गेली त्यानंतर सत्कारमूर्ती च्या हस्ते सरस्वती आरती व पूजा झाली महिला समाज रामनगर च्या अध्यक्षा प्रभा देऊसकर यांनी मुलाखत घेऊन त्यांच्या जीवनातील आगळा वेगळा रोमांचकारी अनुभव जाणून घेतला हा जीवन प्रवास सर्व प्रेक्षकांना अचंभित करून गेला सर्वांनी कौतुकाचा वर्षाव करीत पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा व आशीर्वाद दिले महिला समाज अध्यक्षा अनुराधा कुरेकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली यावेळी ,हितवाद, तरुण भारत,असे अनेक न्यूज पेपर चे पत्रकार ,संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते
Related Posts
नेर येथे खोपडी एकादशीनिमित्त तुलसी विवाह उत्साहात संपन्न
*नेर:* *नेर येथे खोपडी एकादशीनिमित्त तुलसी विवाह उत्साहात संपन्न* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथे कोळी गल्लीत सालाबादाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने कार्तिकी…
जल जीवन मिशन यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचाप.स.सभापती विरसिंग ठाकरे यांचे प्रतिपादन
जल जीवन मिशन यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचाप.स.सभापती विरसिंग ठाकरे यांचे प्रतिपादन नंदुरबार ( प्रतिनिधी =नरेश शिंदे )शहादा समिती येथे झालेल्या प्रशिक्षण…
बंजारा समाज हा अजूनही मागासलेला असून समाजातील मुख्य प्रवाहात येणाऱ्या लोकांनी सामान्य व गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहिले पाहिजे. = हिम्मत राठोड
बंजारा समाज हा अजूनही मागासलेला असून समाजातील मुख्य प्रवाहात येणाऱ्या लोकांनी सामान्य व गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहिले पाहिजे. =…