अनाथ गरीब गरजु मुले हे समाजाचे उत्तर दायित्व–गजानन फडकले

अनाथ गरीब गरजु मुले हे समाजाचे उत्तर दायित्व–गजानन फडकले ———————————————————–ठाणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-आईवडिलांचे छत्र नसलेल्या मुलांना तेवढाच सन्मानाने जगण्याचा हक्क आहे,जेवढा सनाथ मुलांना आहे आणि ही जबाबदारी सर्वस्वी समाजाची आहे.आज हे दायित्व विवेकानंद बाल आश्रम व सदगुरु सेवा ट्रस्ट यशस्वीपणे पार पाडत आहे.हे खरेच कौतुकास्पद आहे.असे उदगार सेवा समाधान फाऊंडेशनचे अध्यक्ष गजानन फडकले यांनी ३०जून रोजी येरुर,ठाणे येथे सेवा समाधान फाऊंडेशनच्यावतीने आयोजित विवेकानंद बाल आश्रमातील अनाथ गरीब गरजु मुलांना शालेय वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात काढले.यांचे संगोपन,निगराणी व सक्षम नागरिक घडविणे हे खरेच कठीण काम आहे.म्हणूनच यांना हातभार लावण्यासाठी सेवा समाधान फाऊंडेशन ही संस्था पुढे आली आहे.यावेळी ४०बालगोपाळ मंडळींना शालेय बॅग वाटप व अल्पोपहार म्हणून देण्यात आला.सुरुवातीला सदगुरु सेवा ट्रस्ट चे व्यवस्थापक आनंद सर यांनी आपल्या संस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली,तर विश्वस्त सौ.मानसी मोने व श्री.संदीप राऊळ यांनी अनुक्रमे प्रास्ताविक उपक्रम व संस्थेची इतर माहिती दिली.याप्रसंगी पत्रकार उत्कर्ष समिती,महाराष्ट्राचे संस्थापक-अध्यक्ष डाॅ.अशोक म्हात्रे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते,त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.श्रृतिका तारी यांनी केले,तर आभार प्रदर्शन संजय सकपाळ यांनी पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!