जिल्हा परिषद शाळा भवानीनगर (बामखेडा त.सा.) केंद्र सारंगखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे आयु. वैशाली रवींद्र केदार (हल्ली मुक्काम भोईसर) यांची मुलगी कुमारी जीविका यांच्या 14 वा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला.

आज दिनांक ०१-०७ -२०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा भवानीनगर (बामखेडा त.सा.) केंद्र सारंगखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे आयु. वैशाली रवींद्र केदार (हल्ली मुक्काम भोईसर) यांची मुलगी कुमारी जीविका यांच्या 14 वा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी सारंगखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री रविंद्रजी पाटील साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य चाररेघी वही, बॉक्स वही , दोन रेघी वही , चित्रकला वही, पेन- पेन्सिल व पावसापासून शाळेत येण्यास अडचण येऊ नये म्हणून अतिशय सुंदर छत्री प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आली. शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांचे निर्देशान्वये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्नेहभोजन उपक्रमाचा हेतू व भाग म्हणून वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मोतीचूरचे लाडू वाटप करण्यात आले. सारंगखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय रविंद्रजी पाटील साहेब यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती सोनवणे मॅडम यांनी स्वागत केले. तसेच शाळेचे शिक्षक श्री संजय निकुंबे यांनी सूत्रसंचालन केले व कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे आभार मानले. भवानीनगर हा पाडा 100% शेतमजुरांचा आहे .अशा या गोरगरिबांच्या मुलांना समाजाकडून , दानशूर व शिक्षणप्रेमी लोकांकडून विविध उपक्रमांद्वारे अमूल्य शैक्षणिक साहित्य मिळाल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका ,शिक्षक, व पालक यांच्याकडून शतशः आभार !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!