शहादा: तालुक्यातील शहाणा मालकातर रस्त्यावर बिअरची वाहतूक करणाऱ्या बोलोरो पिकप गाडी सह मुद्देमाल राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले सुमारे आठ लाख रुपये किमतीचा बियरच्या मद्यसाठ्या विरोधात धडक कारवाई केली या कारवाईमुळे अवैधरित्या मद्यसाठा विक्रेत्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार व निरीक्षक, भरारी पथक, नंदुरबार यांनी दिनांक 04/07/2024 रोजी शहाणा मालकातर रोड, शहाणा शिवार, शहाणा, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे गुप्त बातमीच्या आधारे सापळा रचून केलेल्या कारवाईत चार चाकी वाहन परिवहन क्र MH 18 BG-3093 या वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित मध्यप्रदेश राज्यात निर्मित व फक्त मध्यप्रदेश राज्यात विक्री ग्राह्य असलेली पावर कुल सुपर स्ट्रॉग बियरचे १०० बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये ५०० मि. ली. क्षमतेच्या २४ बियर केन व प्रत्येक केन ची छापील किंमत ११५ रु. असा एकूण २४०० बियर केन व MAHINDRA BOLERO PICKUP-FB PS 1.29 T BS IV चारचाकी असा एकूण रु ७,७६,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई बद्दल दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ब विभाग नंदुरबार यांच्या कार्यालयात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९/२०२४ नोंदविण्यात आलेला आहे.सदरची कारवाई डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई,पी. पी. सुर्वे, संचालक, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, श्रीमती उषा वर्मा, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक, श्रीमती स्नेहा सराफ, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सदर कारवाई बी. एस. महाडीक, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार, व्ही. ए. चौरे, निरीक्षक, भरारी पथक, नंदुरबार, अमित शांतीलल गायकवाड, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ब विभाग, नंदुरबार, पी. व्ही. मोर, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार, एम. के. पवार, सहायक दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार, व राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार जवान सर्वश्री बी. एम. चौधरी, संजय बैसाणे, एम. एन. पाडवी व धनराज पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा श्री. अमित शांतीलल गायकवाड, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ब विभाग, नंदुरबार हे करत आहेत.जनतेला आवाहन करण्यात येते कि अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाटसएप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे