शारदा विद्या मंदिर विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.
आज रोजी शारदा शिक्षण प्रसारक संस्था सारंगखेडा संचलित शारदा विद्या मंदिर, सारंगखेडा येथे इयत्ता 5 वी चा विद्यार्थ्यांना समता फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक ॲड.कृष्णदेवसिंहजी देवेंद्रसिंहजी रावळ,प्रमुख पाहुणे समता फाऊंडेशनचे संस्थापक माजी मुख्याध्यापक आदरणीय यशवंत आर. निकुंबे सर,सचिव भीमराव सर मुख्याध्यापक श्री चित्ते सर, पर्यवक्षक श्री एस व्ही गिरासे उपस्थित होतेत्या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला समता फाउंडेशन या सेवाभावी संस्था मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वही, पाण्याची बॉटल,कलर बॉक्स,पेन ,पेन्सिल,भौमितिक साहित्य उजळणीपुस्तक वाटप करण्यात आले त्या वेळी ॲड.कृष्णदेवसिंहजी रावळ, वाय आर निकुंभे सर , भीमराव सर, मुख्याध्यापक, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विध्यार्थाना संस्थेमार्फत जे शैक्षणिक साहित्य मिळाले ते बहुमूल्य आहे साहित्याचा वापर करूनअभ्यास करावा शाळेकडून समता संस्थेने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद व उल्लेखनीय आहे त्यांचे मनापासून आभार व धन्यवाद करण्यासाठी आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री डी बी बागल सर यांनी व आभार जोशी सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी साठी सर्व शिक्षक,बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते