दोंडाईचा ते मालेगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम हे निकृष्ट दर्जाचे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गिरासे यांनी केली पाहणी

दोंडाईचा ते मालेगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम हे निकृष्ट दर्जाचे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गिरासे यांनी केली पाहणी

दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी

शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथे दोंडाईचा ते मालेगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम हे दुसऱ्या टप्यात सुरू आहे पहिला टप्पा कुसुंबा ते मालेगाव हा बनवण्यात आला त्याच्या संपूर्ण काम राष्ट्रीय दर्जाचे आहे सर्व लहान वळण त्यांनी त्या ठिकाणी सरळ केलीत आणि तो पूर्ण काँक्रिटीकरण करण्यात आला आहे परंतु दुसरा टप्पा कुसुंबा ते दोंडाईचा हा मात्र डांबरीकरण करण्यात येत आहे याची रुंदी दहा मीटर ऐवजी फक्त सात मीटर करण्यात येत आहे सदर राष्ट्रीय महामार्ग हा दोंडाईचा शहरापर्यंत पूर्ण दहा मीटर करण्यात येणे गरजेचे होते परंतु त्यात खूप मोठा बदल करण्यात आला कुठेच नवीन पूल किंवा पाईप मोऱ्या नवीन होत नाही तरी त्यांची फक्त पहिल्यापेक्षा तीन मीटर रुंदी वाढवण्यात आली त्या त्याप्रमाणे रस्त्याच्या फक्त साईट पट्ट्या नवीन टाकून रुंदी वाढवण्यात येत आहे सुरू कामाची नुकतीच पाहणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गिरासे यांनी प्रत्यक्ष जाऊन केली त्यांच्यासोबत स्थानिक परिसरातील ग्रामस्थांना सोबत घेत पाहणी करतांना होत असलेले काम हे निकृष्ट चे दर्जाचे दिसून आले तसेच लहान जे वळण होते त्यांना देखील सरळ करण्यात आले नाही या विषयावर दीपक गिरासे यांनी पंधरा दिवसापूर्वी याबाबत माहिती उपअभियंता साळुंखे साहेब यांना देखील दिली होती परंतु त्यावर कुठल्याही प्रकारे काम मध्ये बदल होताना दिसून आले नाही म्हणूनच आज प्रत्यक्ष काम पाहणी करून सुरू असलेले काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे दिसून आले त्यानंतर तात्काळ काम बंद करण्याचे आव्हान दीपक गिरासे यांनी संबंधित ठेकेदार राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता साळुंखे साहेब यांच्याशी फोन द्वारे चर्चा करून सविस्तर कामाची माहिती दिली त्यावर एका तासात धुळे येथून प्रत्यक्ष उप अभियंता साळुंखे साहेब व कनिष्ठ अभियंता तेजी रावसाहेब सह ठेकेदाराची टीम पोचली व होत असलेल्या कामात योग्य ते बदल तात्काळ करण्यात आला व पुढे रस्त्याची दुरुस्ती सह अंदाज पत्रकानुसार काम करण्याचे आश्वासन त्यांनी दीपक गिरासे यांना दिले यावेळी त्यांच्यासोबत भुरा पाटील, राहुल कुवर, भिमसिंग गिरासे, विकास बागुल, अमोल साळवे सह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!