शिंदखेडा विधानसभेसाठी सामान्य जनतेला लढाव्व्या तरुण नव्या चेहऱ्याची उत्सुकता लागली

*शिंदखेडा विधानसभेसाठी सामान्य जनतेला लढाव्व्या तरुण नव्या चेहऱ्याची उत्सुकता लागली* दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी दोंडाईचा, शिंदखेडा विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या वीस वर्षापासून मोठा राजकीय चेहरा म्हणून सध्याचे आमदार जयकुमार रावल हे आहेत व येत्या विधानसभेत त्यांना भाजपाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. परंतु होणाऱ्या विधानसभेसाठी एक नव्या चेहऱ्याची उत्सुकतेची ओढ वाढली अशी चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे या तालुक्यात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीत 46 हजाराच्या मतांचा भाजपला लीड मिळाला परंतु पुढे भाजपचे पार्डे जळ राहील असे नाही जाणकारांचे मत असे आहे की माजी खासदार सुभाष भामरे यांनी शिंदखेडा तालुक्यात सुलवाडे जामफळ सारखा मोठ्या पाण्याचा प्रकल्प करिता जवळजवळ 2400 कोटी रुपये मंजूर करून त्या कामाला त्यांनी गती दिली व तसेच त्यांचे वागणे हे सरळ आणि साधे होते व त्यांनी कधीच कोणाशी ठोस विरोधकाची भूमिका घेतली नाही व कोणाशी शेडयंत्र राजकारणात त्यांनी आखले नाही म्हणून सर्वसामान्य जनतेला साधा व सरळ खासदार मिळाला होता व त्यांच्यावर तालुक्यात प्रेम करणारी जनता मोठी होती म्हणूनच त्यांना 46 हजारांचा लीड या तालुक्यातून मिळाला. तसेच स्वतः काँग्रेसचे निवडून आले खासदार सौ बच्छाव यांचा राजकीय कोणाशी परिचय जास्त नसल्यामुळे याचा फायदा भाजपचे लीड वाढण्यास खरी मदत झाली परंतु स्थानिक आमदार यांच्या राजकारणात राजकीय बाधा व कारणे खूप वाढले आहेत व त्यांच्या विश्वासू पदाधिकाऱ्यांनी जनतेला विश्वासात घेऊन कामे केली नाहीत अशी ग्रामीण भागात जनतेत चर्चा व नाराजगीचा सुरू जोरात उमटून येत आहे.येत्या विधानसभेत आता सामान्य जनतेला अभ्यासू सर्व सामान्य तरुण चेहऱ्याची उमेदवार म्हणून उत्सुकता लागली आहे यावेळी जनतेच्या मनात एकंदरीत तरुण चेहऱ्याला पसंती दिसत आहे तसेच तालुक्यात पैसा हा फॅक्टर यावेळी चालणार नाही असा राजकीय जाणकार मंडळी अंदाज लावत आहे कोणीही उमेदवार कितीही पैसा खर्च करेल पण जनता शेवटी भाकरीची चव आता पुढे बदलणार असा संकल्प व मानसिकता होईल अशी उलट सुलट चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे सर्वसामान्य शेतकरी आजही त्याला शेतात पाणी नाही त्यामुळे त्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली आहे म्हणून शेतकरी बंधू हवालदिल झालेला आहे तसेच तालुक्यातील तरुण वर्ग बेरोजगार झालेला आहे. यावेळी शिंदखेडा विधानसभेत पक्ष व चिन्ह याला किंमत राहणार नाही कारण कुठल्याच पक्षांनी या तालुक्यात विकासाचा दिवा लावला नाही सर्वच पक्षातील नेत्यांनी व त्यांचे विश्वासू पदाधिकाऱ्यांनी फक्त स्वतःचे मोठे फायदे करून घेतले हे मात्र खरे आहे आता जनतेला सर्व तालुक्यातले राजकारण ज्ञात आहे म्हणून यावेळेस इच्छुक उमेदवार कितीही धन, पैसा, मनुष्य बळ व प्रचार माध्यमाची ताकद वापरेल ती व्यर्थ जाणार असे मत मांडले जात आहे कारण आता जनतेला स्थानिक सत्तेत बदल हवा आहे.आता शिंदखेड्यात कोण नवीन चेहरा विधानसभेत येईल का? नाही याची प्रत्येक मतदार बंधूंला उत्सुकता लागलेली आहे व ही होणारी निवडणूक सत्तेतील लोकांनसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!