*पांडुरंग बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप* शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे दि.10 रोजी जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पांडुरंग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या सौ. पुजा ताई खडसे यांच्या हस्ते वह्या वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य समाजसुधारक, शिक्षणाप्रती अतुट बांधिलकी असलेल्या सुप्रसिद्ध सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्या त्याप्रसंगी सौ पूजाताई खडसे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस धुळे ग्रामीण , लक्ष्मी ठाकूर , सरिता महाजन, सरपंच कैलास आखाडे , उपसरपंच माधव देवरे , ग्रामपंचायत सदस्य दीपक बागुल , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील , उपाध्यक्ष बापू पिंगळे , माजी सरपंच भिका पाटील , बापू पाटील, राजेंद्र पाटील ,किशोर पाटील ,कल्याण पाटील, युवराज देवरे ,भटा पाटील ,भैय्या पाटील सतीश ईशी व मांडळ गावाचे नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ## आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा
*पांडुरंग बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप*
