आई-वडिलांची सेवा न करणाऱ्यांना भयंकर वेदना होतात, आई-वडिलांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा करण्यासारखे आहे, जे लोक आईवडिलांची सेवा करीत नाही त्यांना कळकळीचे अवाहन आहे की त्यांनी एकांतात बसून लहानपणी आई-वडिलांनी तुमच्यासाठी जे जे केले ते आठवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा ,शाळेच्या अभ्यासाचे साहित्य पुरवितात तुमच्या कल्याणासाठी अनेक दुःख वेदना त्यांच्याकडून सहन होत नव्हत्या तरी दुःख अंगावर ओढून घेतले जीवाची परवा न करता आयुष्यात संघर्ष करून तुम्हाला सुखाचे दिवस येण्यासाठी भुके राहून तुम्हाला खाऊ घातले रक्ताचे पाणी केले शेवटी तुम्हाला पायावर उभे करून तुमच्या सुखात आपले सुख मानतात तुम्ही जसे तुमच्या मुलांचे लाड प्यार करीत आहात तसेच तुमचे आई-वडीलही लाड प्यार करीत होते आता या क्षणाला विचार करा की तुमच्या मुलांवर तुम्ही किती जीव तोडून प्रेम करीत आहात मग असेच प्रेम तुमचे आई-वडील तुमच्यावर करीत होते म्हणून एका पत्नीच्या सांगण्यावरून आई-वडिलांना हाकलून देऊ नका ,त्रास देऊ नका तुम्ही,न ऐकल्याशिवाय असे केल्यास तुमची मुले ही तुमची अनुकरण केल्याशिवाय राहणार नाही ज्या लोकांनी आई-वडिलांना हाकलून दिले किंवा ज्यांनी आई-वडील वृद्ध आश्रमांमध्ये पाठविलेले आहे अशा मुलांनी आई-वडिलांना घरी घेऊन यावे घरी आणून त्यांची सेवा करावी हे तुमचे कर्तव्यच आहे असे न केल्यास भविष्यात भयंकर दुःख भोगावे लागेल आणि जी मुले आईवडिलांना आता हल्ली त्रास देत असतील त्यांनी त्रास थांबवावा जे मी तुम्हाला आता सांगत आहे तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर ज्या लोकांनी आई-वडिलांना हाकलून दिले आहे त्या अनुभवी लोकांचे दुःखाची अनुभव ऐकून पहावे तेव्हा तुमच्या लक्षात येईल तरी आई-वडिलांची सेवा न करणाऱ्यांना भयंकर वेदना होतात व असे होऊ नये म्हणून तुमच्या आई वडिलांनी त्यांची कर्तव्य पार पाडले आता म्हातारपणी तुम्ही सुद्धा तुमचे कर्तव्य पार पाडा तशी बुद्धी होत नसल्यास सदबुद्धीसाठी जेथे जेथे सत्संग असेल ते तेथे सत्संग ऐकायला जात राहावे किंवा एखाद्या सद्गुरूंच्या शिष्याकडे जात राहावे म्हणजे पुढे सद्गुरू मार्ग मिळेल मग हळूहळू सर्वकाही व्यवस्थित व्हायला लागेल ,आपला विश्वासू प्रवचनकार श्री भरत भाऊ सपकाळे महाराज वाल्मिक नगर तिरंगा बिल्डिंग तालुका जिल्हा जळगाव खान्देश महाराष्ट्र मोबाईल नंबर, ७०३८८८६९३६
Related Posts
मुक्ताईनगर येथे मराठा बांधवांना आरक्षण मिळाले त्या निमित्त मराठा बांधवांसोबत गुलाल उधळून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला
मुक्ताईनगर येथे मराठा बांधवांना आरक्षण मिळाले त्या निमित्त परिवार परिवर्तन चौकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज विश्वरत्न डॉ बाबासाहेब…
शासन परिपत्रकानुसार माहिती अधिकार दिन साजरा करा – माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची मागणी
शासन परिपत्रकानुसार माहिती अधिकार दिन साजरा करा – माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची मागणीजळगाव – शासन परिपत्रकानुसार 28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय…
चोपडा नगर परिषदेच्या विरोधात
भव्य मुक जन आक्रोश मोर्चा
उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांची घटनास्थळी भेट..
चोपडा नगर परिषदेच्या विरोधातभव्य मुक जन आक्रोश मोर्चाउपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांची घटनास्थळी भेट.. चोपडा विश्वास वाडे प्रतिनिधी आज सकाळी दहा…