६ महिन्यांतच डांबरी रस्ता पाण्याने वाहून गेला,ठेकेदारावर कारवाई करा- बिरसा फायटर्सची मागणी

*६ महिन्यांतच डांबरी रस्ता पाण्याने वाहून गेला,ठेकेदारावर कारवाई करा- बिरसा फायटर्सची मागणी*शहादा प्रतिनिधी :- शहादा तालुक्यातील मंदाणे ते जावदा रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेला,ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा,रस्ता नव्याने खडीकरण व डांबरीकरण करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा,उप अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी,जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन मोते,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,करन चव्हाण,आकाश मोते,भारत सुळे,आकेश सुळे,राकेश सुळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. नंदूरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच बाईट आहे. अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात. खड्‌ड्‌यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो. जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत. मंदाणे ते जावदा रस्त्याचे काम ६ महिन्यापूर्वीच करण्यात आले होते,असे बोलले जाते.या रस्त्याचे निष्कृष्ट काम केल्यामुळे रस्ता पावसाच्या पहिल्याच पाण्याने वाहून गेला आहे. रस्ता पूर्ण पणे उखडला आहे.जिकडेतिकडे खड्डेमय झाला आहे. रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे. निष्कृष्ट काम केल्यामुळेच रस्ता पावसाच्या पाण्याने उखडून गेला आहे.या कामात ठेकेदाराने ओबडधोबड काम करून प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.मंदाणे ते जावदा रस्ता अतिशय खराब असल्याने अपघाताचा प्रसंग जास्त आहे, नागरिकांना येण्या जाण्या साठी त्रासदायक बनला आहे,तरी शहादा तालुक्यातील मंदाणे ते जावदा रस्त्याची निष्कृष्ट कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी व रस्ता नव्याने खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावा.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने प्रशासनास दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!