🙏🏻मतीमंद मुलींच्या शाळेला वैद्यकिय महाविद्यालयाचे MBBS च्या विद्यार्थींची सदिच्छा भेट🙏🏻नंदुरबार : – दिनांक ११ जुलै रोजी नंदुरबार येथील वैद्यकिय महाविद्यालयाचे MBBS चे विद्यार्थींनी गुरुकुल नगर येथील मतीमंद मुलींची निवासी शाळा येथे सदिच्छा भेट दिली .या वेळी संस्थेचे अध्यक्ष भास्कर कुवर उपस्थित होते.विद्यार्थीनी मतीमंद शाळा सुरु करण्याची कल्पना कशी सुचली अशी विचारणा केली.त्यावेळी भास्कर कुवर सरांनी सांगितले की मी खुपकाही श्रीमंत पैसेवाला नसुन सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असून फक्त शिक्षकी पेशा असल्यामुळे व दिव्यांग कर्म असल्यामुळे माझी नियुक्ती जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या मार्फत सन 2001 ला केंद्रीय गव्हर्मेंट दिल्ली यांच्या राष्ट्रीय न्यास समितीवर दिव्यांग सदस्य म्हणून नियुक्ती केले .दर तीन महिन्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व एचओडी यांच्या उपस्थितीत आणि समाज कल्याण अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असल्यामुळे तेही उपस्थित राहतात. बऱ्याचदा मतिमंद व बहु विकलांगांसाठी कार्यशाळा व पालकांना माहिती व्हावी म्हणून वैद्यकीय तपासणी मतिमंद व बहुविकलांगांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यावेळेस मतिमंदांचे पालक यांनी उपस्थित केलेला प्रश्न जर मतिमंद मुलींची स्वतंत्र शाळा जर असेल तर खूप चांगलं राहील .वास्तविक नंदुरबार जिल्ह्यात इंग्लिश मीडियम ,मराठी मिडीयम च्या भरपूर शाळा गल्लोगल्लीत उपलब्ध दिसतील .परंतु मतिमंद व बहु विकलांग हा सगळ्यात उपेक्षित प्रवर्ग असल्यामुळे त्यांच्या शाळा काढण्याची रिस्क कोणीही घेत नाही कारण या शाळा जवळपास पुणे ,मुंबई, नागपूर येथेच आहेत. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असल्याकारणाने या जिल्ह्यात मतिमंद मुलींची शाळा अत्यावश्यक होती. व ती शाळा काढण्याचे पालकांचे बोल माझ्या हृदयात भिडले व माझ्या कुठलाही शाळा काढण्याच्या पिंड नसताना व राजकीय बॅक ग्राउंड नसताना मी स्वतः दिव्यांग असल्यामुळे व राष्ट्रीय समितीवर सदस्य असल्यामुळे ही शाळा काढण्याची रिस्क घेतली. व माझ्या आईच्या नावाने ही शाळा 2008 ला नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात सुरू केली. आज जवळपास सोडा वर्षे या शाळेला कायम विनाअनुदानित चालवत आहे .या शाळेला सगळ्या सोयी सुविधा अ श्रेणीच्या उपलब्ध असून ही शाळा भाड्याच्या इमारतीत सुरू आहे .परंतु शासनाचे आजतागायत वेळोवेळी पाठपुरावा केलेला असून सुद्धा शासनाचे दुर्लक्ष आहे. अनुदानासाठी अत्यावश्यक गरज असताना पंधरा ते वीस वर्षे या शाळा शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. या शाळेवर आज पर्यंत रोटरी क्लब ;लायन्स क्लब, लायनेस क्लब व इतर सामाजिक कार्यकर्ते व काही डॉक्टर यांचेही हातभार या शाळेला लागत आहेत. जसे कोणी शैक्षणिक साहित्य देऊन जातं .कोणी कपडे कोणी जेवणाच्या खर्च वगैरे उचलतात. कोणी किराणा वगैरे देऊन जातं. अशा पद्धतीने ही शाळा गेल्या 16 वर्षापासून कायम विनाअनुदान तत्त्वावर सुरू आहे .अशा पद्धतीचे संस्थेचे अध्यक्ष भास्कर कुवर यांनी सांगितले. नंतर MBBS च्या शेवटच्या वर्षाला असलेला हर्षल राजु केदारे या विद्यार्थीचा वाढदिवस केक कापुन मतीमंद मुलींसोबत साजरा केला.व मतीमंद मुलींना कचोरी,खमण,केडी नास्ता देण्यात आला.यावेळी सोबत MBBS चे प्रमोद वडजे,आदित्य भोळे,प्रितीश नाईकनवरे,प्रज्वल काटकर,गौरव कोंगले,स्नेहल पठारे,प्रतिक्षा थोरवे,श्रृति पाटिल,मधुरा हेंबाडे,विधी सोमकुवर,मैथिली कर्मरकर व समृद्धी उपस्थित होते.शाळेचे कर्मचारी अभिलाषा वसावे,वैशाली कोळी उपस्थित होते.
Related Posts
बारामती विकासाचा मानबिंदू : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
बारामती विकासाचा मानबिंदू : क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पुणे ते बारामती…
कमरावद* येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदाय दिंडीचे आयोजन
*कमरावद* येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदाय दिंडीचे आयोजन शाळेत जणूकाही विठ्ठल नामाची शाळा भरली होती विद्यार्थी…
खंडलाय बु. येथील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागेची मोजणी अखेर पूर्ण
*खंडलाय बु. येथील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागेची मोजणी अखेर पूर्ण:* *नेर:* धुळे तालुक्यातील खंडलाय बु. येथील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जागेची…