वसंतराव नाईक महाविद्यालयात जागतिक सर्प दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

*वसंतराव नाईक महाविद्यालयात जागतिक सर्प दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन* *शहादा, दिनांक 16 जुलै 2024. येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात जागतिक सर्प दिनानिमित्त प्राणीशास्त्र विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जी. एस. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व एकूणच समाजात सर्प या प्रजातीबद्दल जनजागृती व्हावी हा महत्त्वाचा उद्देश साधला गेला. कार्यक्रमात आपल्या प्रस्तावने प्रा. डॉ. साहेबराव ईशी यांनी हा दिवस साजरा करण्यामागची कारणे आणि एकूणच जनमानसात सर्प या प्रजातीबद्दल पसरलेले समज- गैरसमज यांचा सखोल उलगडा करत विद्यार्थ्यांना शास्त्रीय कारणाने युक्त उपयोगी माहिती दिली. त्यांनी सांगितले की जगभरात हा दिवस 1970 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. सोबतच पृथ्वीवर सापांच्या तीन हजाराहून अधिक प्रजाती असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. डी. पाटील यांनी आपल्या वक्तव्यातून सर्प या प्रजातीबद्दलची समाजात असलेली अंधश्रद्धा, विषारी-बिनविषारी सर्प, त्यांची उपयोगिता, त्यांचा शास्त्रीय अभ्यास या बाबींची चर्चा केली.* *प्रा. जी. एस. पाटील आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, जगात साप हा सर्वात जास्त गैरसमज असलेला प्राणी आहे. पण पर्यावरणाच्या समतोलासाठी या प्राण्याचे विशेष महत्त्वही आहे. शेतकऱ्याचा सच्चा मित्र म्हणून जगात अनेक ठिकाणी यांचे पालनही केले जाते. भारतात 16 जुलै हा दिवस सापांच्या संवर्धनाचे महत्त्व सांगण्यासोबतच समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी ही राबविण्यात येतो. जैवविविधतेने संपन्न असलेल्या भारतात या प्राण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या प्राण्याबद्दल विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगत समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. प्रा. आर. के. पाटील, प्रा. जी. एस. चौधरी यांनी आपल्या मनोगतुन आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. साहेबराव ईशी तर आभार प्रकटन प्रा. आर. एन. गिरासे यांनी व्यक्त केले. प्रा. गणेश पडघन व प्राणिशास्त्र प्रयोगशाळा परिचर श्री. बाळकृष्ण पवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!