मतीमंद मुलींची निवासी शाळे तर्फे आषाढी एकादशी निमित्त विठुरायाची पालखीची मिरवणुक काढण्यात आली.
नंदुरबार : – येथील गुरुकुलनगर मधिल मतीमंद मुलींच्या शाळे तर्फे आज आषाढी एकादशी निमित्त विठुरायाची पालखी सजवण्यात आली .व मतिमंद शाळेवरून गुरुकुल नगर मध्ये सदर विठुरायाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली .यावेळी मतिमंद निवासी शाळेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते .मतिमंद मुलींची निवासी शाळेतर्फे दरवर्षी काही ना काही नवीन उपक्रम राबविले जातात. जसे वृक्षारोपण ,वृक्षदिंडी, लेख शिकवा लेक वाचवा, झाडे लावा ,मतदार जनजागृती ,अशा प्रकारच्या नवीन नवीन कार्यक्रम या शाळेमध्ये राबवले जातात .व यावर्षी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाची पालखी सजवून पालखीची मिरवणूक गुरुकुल नगरातून काढण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कोळी,जयेश वीर, विकास महाले, राहुल एळवे, अभिलाषा वसावे ,मनीषा बेडसे, निर्मला गावित, वैशाली कोळी ,वर्षा वळवी, रंजना भोपे ,दिनेश चित्ते,जयेश कुवर व संस्था संचालिका भारती कुवर यांच्या मुख्य उपस्थितीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व मतिमंद मुलींनी वेगवेगळे ड्रेस परिधान केलेले होते.
मतीमंद मुलींची निवासी शाळे तर्फे आषाढी एकादशी निमित्त विठुरायाची पालखीची मिरवणुक काढण्यात आली
