दोंडाईचा पोलिसांनी चोरी करणाऱ्या चोरट्यांस मोबाईलसह रंगेहाथ पकडले

*दोंडाईचा पोलिसांनी चोरी करणाऱ्या चोरट्यांस मोबाईलसह रंगेहाथ पकडले*

दोंडाईचा प्रतिनिधी गोपाल कोळी

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे पोलीसांनी चोरी करुन मोबाईल विक्री करणारा चोरट्यास चोरीतील मोबाईल सह रंगेहाथ पकडले दोंडाईचा शहरात व परीसरात मागील काही दिवसापासुन मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या दिशेने दोंडाईचा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.निरीक्षक निलेश मोरे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोसई/चांगदेव हंडाळ आणि पोसई/नकुल कुमावत व शोध पथकातील अंमलदारासह दि.१७/०७/२०२४ रोजी १६.०० वाजेचे सुमारास दोंडाईचा शहरातील शहादा रोड वरील दाल मील परिसरात मेहबुब सुवानी दग्र्याचे मागील बाजूस असलेल्या भागात चोरीतील मोबाईल फोन विक्री करीत असलेला संशयीत -शाहिद जावेद शहा ऊर्फ खत्री रा. अशोक नगर दोंडाईचा ता.शिंदखेडा यांने मागील काही दिवसात दोंडाईचा शहर व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहुन चोरी केलेले एकुण १५ महागडे मोबाईल फोन यांची चोरटी विक्री करीत असतांना त्यांस रंगेहाथ पकडले आहे. सदर मोबाईल फोन यांचेवर्णन खालील प्रमाणे आहे. 15,000/- रु किमंतीचा रिअलमी कंपनीचा हिरव्या रंगाचा मोबाईल फोन त्यांचा IMEI NO १५,०००/- रु असा अल्स ३६ जु.बा.कि.अ किमंतीचा रिअलमी कंपनीचा गोल्डन रंगाचा मोबाईल फोन त्याचा IMEI ΝΟ 5000/- रु असा असलेला जु.वा.कि.अ किमंतीचा लावा कंपनीचा मागील कव्हर नसलेला मोबाईल फोन त्यांचा IMEI NO १५,०००/- रु असा असलेला जु.वा.कि.अकिमंतीचा व्हिवो कंपनीचा फिक्कट आकाशी रंगाचा मोबाईल फोन त्यांचा IMEI NO असा असलेला जु.वा.कि.अ 20,000/- रु किमंतीचा व्हिवो कंपनीचा ब्राऊन रंगाचा मोबाईल फोन त्यांचा IMEI ΝΟअसा असलेला जु.वा.कि.अ१५,०००/- रु किमंतीचा ओप्पो कंपनीचा निळया रंगाचा मोबाईल फोन त्यांचा IMEI NO ५,०००/- रु असा असलेला जु.वा.कि.अ किमंतीचा सॅमसंग जे ७ प्राईम कंपनीचा निळया रंगाचा मोबाईल फोन त्यांचा IMEI NO 10,000/- रुकिमंतीचा व्हिवो कंपनीचा लाल काळया रंगाचा मोबाईल फोन त्यांचा IMEI NO असा असलेला जु.वा.कि.अ 10,000/- आणि किमंतीचा रेडमी कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल फोन त्यांचा IΜΕΙ ΝΟ असा असलेला जु.वा.कि.अ 5000/- रु किमंतीचा सॅमसंग कंपनीचा निळया रंगाचा मोबाईल फोन त्यांचा IMEI NO 11 5000/- रु असा असलेला जु.वा.कि.अ. 5000/- रुकिमंतीचा रिअलमी कंपनीचा निळया रंगाचा मोबाईल फोन त्यांचा IMEI NO 10000/- रु असा असलेला जु.वा.कि.अ किमंतीचा आयटेल कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल फोन जु.वा.कि.अ 15,000/- रु किमंतीचा संमसंग कंपनीचा हिरवट सिल्वर रंगाचा मोबाईल फोन जु.वा.कि.अ किमंतीचा व्हिवो कंपनीचा निळसर रंगाचा मोबाईल फोन जु.वा.कि.अ 5000/- रु किमंतीचा ओपो कंपनीचा आकाशी रंगाचा पुढील काच फुटलेला मोबाईल फोन जु.वा.कि.अ एकुण १,५५,०००/- रु सदरची कामगिरी हि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश मोरे, पोसई/चांगदेव हंडाळ, नकुल कुमावत, असई/राजन दुसाने पोहेको सुनिल महाजन, पोकों/पुरुषोत्तम पवार हिरालाल सूर्यवंशी, अनिल धनगर, संदेश बैसाणे, हर्षद बागुल अशांनी केली आहे. सदर बाबत पोकों/अनिल धनगर यांनी दिलेल्या फिर्याद दिल्यावरुन दोंडाईचा पोलीस ठाणे भारतीय न्याय हिता सन २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ/१२७२ सुनिल रतिलाल महाजन हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!