आयुष्यभर मी फक्त नोकरीच केली,
मी राहिलो कामात तिने मात्र भाकरीच केली.
धावाधाव -धावाधाव माझी नुसती चकरेच फिरली…,
तिने मात्र गतीपासून फारकत घेतली.
मिळाला पैसा मिळाले मला प्रमोशन…,
तिने मात्र घेतले पेन्शन चे टेन्शन.
झालो रिटायर्ड मी देतो स्माईल आणि एक्स्प्रेशन..,
ती मात्र तेथेच होते नाराज आणि डिप्रेशन.
काय गुन्हा तिचा पसंती याची नोकरीला…,
चाकर राहिला तिचा भाकरीतच जीव माझा फ़िरत राहिला.
आनंदाचा झुला झुलवीन तुला म्हणत,
स्वतःच मात्र झुलत राहिला.
झोका देत देत मात्र,
तिचा देह झीजत राहिला.
अजब खेळ नोकरीचा…,
डाव आयुश्याचा मांडला.
जिंकली मात्र तीच, हा मात्र खेळत राहिला.
शब्दांकन-श्री चंद्रकांत बिंदा गुरव,नाशिक(मो.नं.9766761066)