*कमरावद* येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदाय दिंडीचे आयोजन शाळेत जणूकाही विठ्ठल नामाची शाळा भरली होती विद्यार्थी हे वारकरी बनले होते. डोक्यावर पांढरी टोपी, वारकरी टिळा, टाळ-वीणा घेत सहभागी होते. विद्यार्थिनींनी साडी परिधान करत डोक्यावर तुळस ठेवून दिंडीत सहभागी होत्या. सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.विठ्ठल नामाचा गजर करीत वारकरी संप्रदायाच्या दिंडी सोहळ्याप्रमाणे विद्यार्थी वेशभूषेत उपस्थित होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून त्यांची ओळख व्हावी त्यासोबतच वृक्ष संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक श्री आहिरे सर अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी परिश्रम घेतले.
कमरावद* येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदाय दिंडीचे आयोजन
