कणकवलीत राज्य लाॅटरीचे उदघाटन,आता एस.टी.तेथे,राज्य लाॅटरी केंद्र

कणकवलीत राज्य लाॅटरीचे उदघाटन,आता एस.टी.तेथे,राज्य लाॅटरी केंद्र ————————————————————कणकवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-गेली५५वर्षाची परंपरा असणारी,आदर्श अशा महाराष्ट्र राज्य लाॅटरीच्या अधिकृत लाॅटरी विक्री केंद्राचा उदघाटन सोहळा कणकवली एस.टी.डेपो आवारात आगर व्यवस्थापक अजय द.गायकवाड यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.यावेळी ग्राहक,विक्रेते,एस.टी.चे कर्मचारी,प्रवासी यांनी शुभेच्छा व्यक्त करुन या लाॅटरी केंद्रामुळे नशीब अजमविण्याची संधी मिळणार असल्याचे समाधान व्यक्त केले.कणकवली आगाराचे व्यवस्थापक अजय द.गायकवाड यांनी शासकीय लाॅटरीच्या विकासासाठी हा उपक्रम असुन एस.टी.महामंडळ यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.यावेळी एस.टी.चे वाहतुक नियंत्रक कृष्णा मुळदेकर वरिष्ठ लिपिक दिलिप जाधव यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि लाॅटरी केंद्राला शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र राज्य लाॅटरी विक्रेत्यांचे जेष्ठ नेते विलास सातार्डेकर याप्रसंगी उपस्थित होते.ग्राहक व विक्रेते यांच्या हिताचे रक्षण करून राज्य लाॅटरीची विक्री विक्रमी करण्यासाठी अशी लाॅटरी केंद्र ही प्रत्येक एस.टी.आगारात उभारणे काळाची गरज आहे.त्यासाठी लाॅटरी संघटना पुढाकार घेईल,असे विलास सातार्डेकर यांनी स्पष्ट केले आणि एस.टी.च्या कणकवली आगाराच्या प्रशासनाचे जाहीर आभार मानले.याप्रसंगी विनय रेवडेकर,विलास पडवळ,सुरेश महादळकर,यज्ञेश पडवळ,परशुराम झगडे,नंदकुमार मसुरकर,सौ.निलिमा पडवळ,सौ.वैशाली पडवळ,सौ.नीलिमा मसुरकर इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!