एस बी आय आरसेटी नंदुरबार येथे सेल फोन रिपेअर आणि सर्व्हिस प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता

एस बी आय आरसेटी नंदुरबार येथे सेल फोन रिपेअर आणि सर्व्हिस प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे दिनांक २४ जून ते २३ जुलै या कालावधीत सेल फोन रिपेअर आणि सेवा हे ३० दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, त्यात एकूण ३२ प्रशिक्षणार्थीनी प्रवेशित झाले होते सदर प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना मोबाईल दुरूस्ती विषयी परिपूर्ण प्रात्यक्षिक सह प्रशिक्षण देण्यात आले, त्यासोबत उद्योजकता विकास कार्यक्रमाचेही प्रशिक्षण देण्यात आले। उद्योजकीय सक्षमता , प्रभावी संभाषण कौशल्य तसेच बँकींग, व्यवसायासाठी आवश्यक प्रकल्प अहवाल याविषयी माहिती देण्यात आली प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता दिनांक २३ जुलै रोजी करण्यात आली या कार्यक्रमाला आरसेटीचे संचालक श्री गणेश पठारे, डोमेन असेसर श्री व्यंकटेश शेंडे, ईडीपी असेसर श्री जी जे पाटील सी वाय डि ए संस्थेचे श्री मिलिंद पाटील आणि प्रशिक्षक श्री दत्तात्रेय बेलदार उपस्थित होते या प्रसंगी श्री पाटील यांनी आरसेटी विषयी माहिती दिली आणि नवनविन प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती आपल्या परिसरातील युवक / युवतींना देऊन आरसेटीत प्रवेश घेण्यासाठी उद्युक्त करावे असे आवाहन केले आरसेटीचे संचालक श्री. गणेश पठारे यांनी युवकांनी कठोर परिश्रम करावे आणि आपली प्रगती साधावी, कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर आरसेटी तुम्हाला सदैव मदत करण्यासाठी तत्पर आहे म्हणून इथुन माघार नाही असे संबोधले सूत्रसंचालन श्री. गिरधर बैसाणे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अश्विनी पाटील , पूर्वीशा बागूल , जयश्री आगळे , राजेंद्र पवार , यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!