आण्णा कोळी , महादेवपुरा दोडाईंचा
*दोडाईंचा : अवैध धंदे व चोऱ्यांचे नुतन पोलीस निरीक्षक मा.किशोर परदेशी यांच्या पुढे आव्हान*नुतन पोलीस निरीक्षक मा. किशोर परदेशी किती दिवस कर्तव्यदक्ष राहतात हेच पाहणे उत्सुकतेचे 50 रू बुके घेऊन अभिनंदन करणाऱ्या मान्यवंरानी दोडाईंचा पोलीस स्टेशन झिरो पोलिस चालवत आहेत अशी माहिती द्यावीदोडाईंचा – शहरासह तालुक्यात मागील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या कार्याकाळात अवैध धंदेवाईक व चोरांनी कधी नव्हे एवढा कळस गाठला आहे . सर्वत्र राजरोसपणे सुरू असलेल्या या अवैध धंदे व्यवसायीक भुरट्या चोऱ्या करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी आजही कायम आहे.आतापर्यंत मात्र पोलीसांना यावर जरब निर्माण करता आली नाही. राजकीयांची खाण म्हणून तालुक्याची जिल्ह्यात प्रचिती आहे. मातब्बर लोकप्रतिनिधी तालुक्यात असतांना आलबेलचे चित्र शेजारील तालुक्यांनी गृहीत धरले आहे. मात्र इतर बाबत आलबेल नसले तरी मात्र अवैध धंदे व भुरट्या चोऱ्या करणाऱ्यासाठी ते आलबेल असल्याची कटुसत्य नाकारता येत नाही. बऱ्याच ठिकाणी रोजची लाखों रूपयाची उलाढाल सुरू असून त्याकडे पोलीस यंत्रणा सोयीने डोळेझाक करून आपला आशीर्वाद ठेवत असल्याचा आरोप सर्वसामान्यांच्या तोंडात आहे. आणि याला राजकीय पाठबळ आहे. दोडाईंचा पोलीस स्टेशन हे झिरो पोलीस चालवतात हे त्रिवार सत्य परिस्थिती आहे. दोडाईंचा पोलीस स्टेशनचा पि.जी. रूम मधे सर्व महिण्याचा हिशोब करून प्रत्येकाची हिस्सेदारीची वाटणी करणयात येते याला आळा नाही बसला तर नुतन पोलीस निरीक्षक यांच्या बाबत पुराव्यानिशी वरिष्ठांना तक्रार करण्यात येईल. दोडाईंचेत अनेक घरफोड्या , मोटारसायकली , मोबाईल चोरीच्या घटनेच्या उलघडा झालेला नाही नूतन दोडाईंचा पोलीस निरीक्षक मा. किशोर परदेशी हे यावर कसे नियत्रंण आणतात आणि आपला कार्यकाळ कशा पद्धतीने पार पाडतात याकडे दोडाईंचा सह तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे.